Nagpur Crime  AI Image
महाराष्ट्र

Shocking : नागपूर हादरले! कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण आले समोर

Nagpur Crime News : नागपुरातील मेडिकल चौक परिसरात कुख्यात गुंडाची चाकूने वार करून आणि सिमेंटच्या कुंडीने डोक्यावर प्रहार करत निर्घृण हत्या. कौटुंबिक वादाचा संशय असून, फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत

Alisha Khedekar

नागपूर शहरातील मेडिकल चौक परिसरात गुरुवारी रात्री एका कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पलाश वासनिक असे मृत गुंडाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान मेडिकल रुग्णालयाच्या गेटजवळ हा प्रकार घडला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही आरोपींनी पलाश वासनिक याच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी जवळच असलेल्या सिमेंटच्या कुंडीने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पलाशचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पलाश वासनिक हा रामबाग परिसरातील रहिवासी असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला होता. या हत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पलाशचा मेव्हणा चिंटू उर्फ आयुष धुपे आणि त्याच्या साथीदारांचा या हत्येत सहभाग असल्याची चर्चा आहे. पलाशकडून बहिणीला त्रास दिला जात असल्याने मेव्हण्याने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून बॅरिकेडिंग केले. हत्येनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे मेडिकल चौकातील वाहतुकीवरही परिणाम झाला. मध्यरात्रीपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. हत्येमागचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment: गुगल पे, फोन पे वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! NPCI ची नवी योजना, पाहा काय होणार फायदा?

Maharashtra News Live Update: कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Healthy Diet : हाडांच्या मजबुतीसाठी नाचणी ठरतेय वरदान! छोट्याशा दाण्यात कॅल्शियमचा मोठा खजिना

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ८ ते १० वाहने एकमेकांवर आदळली

मेथीच्या भाजीचा कडूपणा कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT