Nagpur Marathwada Airline Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Marathwada Airline: खुशखबर! नागपूर-मराठवाडा विमानसेवा लवकरच; एका तासाच्या आत ये-जा करता येणार!

Flights From Nagpur To Chhatrapati Sambhajinagar: नागपूर मराठवाडा विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे काही तासांचे अंतर काही मिनिटांमध्ये पार होणार आहे.

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूर आणि विदर्भातील नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. कारण नागपूर ते मराठवाडा ही विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही विमानसेवा सुरू आहे. त्यानंतर काही तासाचे अंतर मिनिटांत होणार पार होणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नागपूर ते नांदेड विमानसेवा २७ जूनपासून स्टार एअरची सेवा सुरू होणार (Nagpur Marathwada Airline) आहे. ही विमानसेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार अशी चार दिवस असणार आहे.तेच नागपूर ते छत्रपती संभाजीनगर इंडिगो एअरलाईन्स विमानसेवा 2 जुलैपासून सुरू होणार आहे. ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस असणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शहरांदरम्यान विमानसेवा सुरू होत असल्यामुळे हे दोन प्रदेश अधिक जवळ येत आहेत.

नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशातील अतिशय महत्वाची आर्थिक केंद्र आहेत. या दोन्ही शहरांदरम्यान रोज मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. त्यासाठी नागपूर ते छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी ट्रॅव्हल्सचा उपयोग होत असल्याचं (Flights From Nagpur To Chhatrapati Sambhajinagar) दिसतं. या प्रवासामध्ये किमान बारा आणि किंवा त्यापेक्षाही जास्त तास लागतात. परंतु आता हे अंतर काही मिनीटांत पार होणार आहे.

नागपूर (Nagpur) ते छत्रपती संभाजीनगर अशी थेट रेल्वेसेवा नाही. त्यामुळे थोड्या रेल्वे छत्रपती संभाजीनगर येथे थांबतात. त्यामुळे असा प्रवास करणं जास्त कठीण आणि वेळखाऊ आहे. या प्रवासात खासगी ट्रॅव्हल्सपेक्षाही जास्त वेळ जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिसत आहे. परंतु आता या सर्व समस्या सुटणार आहेत, कारण विमानसेवा सुरू होत आहे. नांदेड ते नागपूर ५० मिनिट आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) प्रवास केवळ अवघ्या १ तासात पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT