Nagpur Hit And Run Case Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Hit And Run Case: नागूपर हिट अँड रन प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला, ४ वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Nagpur Car Accident Update: नागपूरमध्ये रविवारी मध्यरात्री एका भरधाव कारने रस्त्यच्या कडेला झोपलेल्या ९ जणांना चिरडले होते. या अपघातामध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Priya More

पराग ढोंबळे, नागपूर

नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे. उपचारादरम्यान ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणातील मृतांचा आखडा ३ वर गेला आहे. रविवारी मध्यरात्री नागपूरच्या दिंघोरी नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना भरधाव कारने चिरडले होते. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ रविवारी मध्यरात्री हिट अँड रनची ही घटना घडली होती. मध्यरात्री १२.३० वाजता ही घटना घडली होती. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बंजारा कुटुंब झोपले होते. त्यावेळीच भरधाव कारने त्यांना चिरडले. या कारने ९ जणांना चिरडले होते. या अपघातामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला होता. तर आज उपचारादरम्यान ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

नागपूर हिट अँड रन प्रकरणात नागपूर पोलिसांनी कार चालकासह ६ जणांना अटक केली आहे. कार चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. तसंच, कारमधील इतर सर्वजण देखील दारु प्यायले होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ते दारु प्यायले होते हे उघड झाले आहे. या अपघात प्रकरणामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Male Birth Control Pill: आता पुरूषांसाठी देखील गर्भनिरोधक गोळी, कशी करते काम? वाचा सविस्तर...

Maharashtra News Live Update: क्रांती येत आहे, आम्ही सत्ताबदलाच्या दिशेने जात आहोत - संजय राऊत

Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots: पिंपल्स आणि काळ्या डागांवर सोपा घरगुती उपाय, घरच्या घरी बनवा केमिकल फ्रि फेसवॉश!

कानाला बंदूक,२ राऊंड फायर अन् २७ किलो सोनं गायब! जळगावात चित्रपटालाही शोभेल असा बँक दरोडा, असा उघड झाला कट

भाजपचा अजब कारभार! वर्षभरापूर्वी निधन झालेल्या नेत्याला कार्यकारिणीत स्थान; दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT