Nagpur chlorine gas leak latest news  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Nagpur : नागपुरात मध्यरात्री गॅस गळतीने हाहाकार! ४० जण रुग्णालयात; या भागात जाण्यास बंदी

Nagpur Gas Leak: नागपुरातील गोधणी जलशुद्धीकरण प्रकल्पात मध्यरात्री क्लोरिन गॅस गळती झाल्याने ४० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४ ते ५ जण ICU मध्ये असून २०० मीटर परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur chlorine gas leak latest news : नागपूरमधील गोधणी परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरिन वायूची भीषण गळती झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. गोधणी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात (वाटर ट्रिटमेंट प्लांट) अचानक क्लोरिन गॅस लीक झाल्याने परिसरातील नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाला. या घटनेत प्रकल्पामधील ८ ते १० कर्मचाऱ्यांसह परिसरातील २० ते २५ नागरिक, अशा तब्बल ४० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

४ ते ५ जण आयसीयूमध्ये, परिसरात भीतीचे वातावरण

मध्यरात्री अंदाजे १२:१५ वाजताच्या सुमारास जलशुद्धीकरण केंद्रात ही गॅस गळती सुरू झाली. हवेत गॅस पसरल्याने लोकांना अचानक दम लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. बाधित ४० जणांपैकी ४ ते ५ नागरिकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले असून इतरांवर सामान्य कक्षात उपचार सुरू आहेत.

रात्रीपासून NDRF आणि पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) च्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीपासूनच पोलिसांनी परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबवून बाधित नागरिकांना रुग्णालयात पोहोचवले, तर इतरांना सुरक्षित स्थळी हलवले. गॅस न्यूट्रलाईज करण्यासाठी एनडीआरएफचे पदाधिकारी विशेष सेफ्टी सूट (PPE Kit) घालून ३ ते ४ वेळा प्लांटच्या आत जाऊन आले आहेत. गॅस गळती रोखण्याचे आणि ती पूर्णपणे निष्प्रभ करण्याचे काम अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे.

नागपूर शहर पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूर शहर पोलिसांनी 'फागो पाटील ले-आऊट' आणि 'नागमंदिर टेकडी' जवळील २०० मीटरच्या परिसरात नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

सकाळी ११:०० वाजेपर्यंत नागरिकांनी या २०० मीटरच्या परिसरात जाणे पूर्णपणे टाळावे.

परिसरात गॅसचा प्रभाव पूर्ण संपेपर्यंत योग्य ती खबरदारी बाळगावी.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

मध्यरात्री सरकारी रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू, ६ गंभीर, ३६ चिमुकल्यांना वाचवले

Medicine Storage Tips : घरात 'या' ७ ठिकाणी कधीच गोळ्या-औषधं ठेवू नका! कारण जाणून घ्या

Monday Horoscope : शंकराची कृपा राहील! 5 राशींची भरभराट होणार, पैसा खर्च करताना काळजी घ्या; वाचा सोमवारचे राशीभविष्य

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

SCROLL FOR NEXT