नागपूर हादरले; अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सहा नराधमांचे कृत्य Saam Tv
महाराष्ट्र

नागपूर हादरले; अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सहा नराधमांचे कृत्य

राज्याच्या उपराजधानी मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नागपुर मध्ये केवळ साडे तीन तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका १६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: राज्याच्या उपराजधानी मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नागपुर मध्ये Nagpur केवळ साडे तीन तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका १६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप झाला आहे. धक्कादायक म्हणजेच जवळपास सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे वृत्त आहे.

घडले असे की, गुरुवारी रात्री घरच्यासोबत क्षुल्लक वाद झाला. या करणाने ती मुलगी घर सोडून गेली आणि त्यानंतर ही भयानक घटना घडली आहे. पोलिसांनी ४ जणांना या गँगरेप प्रकरणी अटक केली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री घरच्यासोबत क्षुल्लक वाद झाला. या करणाने ती मुलगी घर सोडून गेली. सिव्हिल लाईन्सला जाण्यासाठी रिक्षा तिने पकडली. पण चालकाला कळले की तिच्याकडे पैसेच नाहीत. तिच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याने तिला रिक्षातून खाली उतरण्यास सांगितले. त्याच दरम्यान पीडित मुलीने मदतीसाठी मोहम्मद तौसीफ (वय २६) आणि मोहम्मद शाहनवाज उर्फ सना (वय २५) या दोन रिक्षाचालकांशी संपर्क केला. मात्र या दोन्ही आरोपींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेले. त्या ठिकाणी नेऊन तिच्यावर चार जणांनी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करून तिला रिक्षाने मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिज जवळ सोसून दिले.

या संदर्भात एका वृत्तसंस्थेने माहिती दिली की, आरोपी तौसिफ आणि सना यांनी मुलीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाजवळ IGGMCH रिक्षाचालक मोहम्मद मुशीर (वय २३) आणि आणखी एका व्यक्तीला दिले. तिथे मोहम्मद मुशीर आणि इतर व्यक्तींनी मुलीवर रिक्षामध्येच बलात्कार केला आणि पळून गेले.

या किशोरवयीन मुलीला इतर दोन ऑटोरिक्षा चालकांनी पाहिले, ज्यांनी तिला एकट्या विस्कटलेल्या अवस्थेत पाहून मदतीची ऑफर दिली आणि तिला नागपूर रेल्वे स्थानकावर नेले. त्यांनी तिथून जाण्याची इच्छा असल्याने त्यांनी एक हजार रुपये गोळा केले आणि तिच्यासाठी मनमाडला पोहोचण्यासाठी तिकीटही खरेदी केले. तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन ऑटोरिक्षा चालक तेथून निघून गेले.


त्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) च्या कर्मचाऱ्यांनी या तरुणीला पाहिले, ज्याने तिला एका एनजीओकडे सोपवले. आरपीएफ आणि स्वयंसेवी संस्थेने नंतर तिला जीआरपीच्या ताब्यात दिले, ज्याने मुलीला आश्रयगृहात पाठवले. शेल्टर होममध्येच तिने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघड केले.


जीआरपीच्या वरिष्ठ निरीक्षक मनीषा काशिद यांनी सांगितले की, मुलीचे बयान नोंदवण्यात आले आणि लगेच तीन जणांना गोळा करून सीताबुल्डी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सीताबुल्डी पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्हेगारांवर अॅट्रॉसिटी कायदा लागू केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT