Nagpur Latest News Today Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: सख्खा भाऊच बनला पक्का वैरी, पैशाच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; ७ महिन्यानंतर घटनेचा उलगडा

Nagpur Crime News: पैशाच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या करत मृतदेह जमिनीत पुरला. तब्बल ७ महिन्यानंतर कोराडी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे

Satish Daud

Nagpur Latest News Today

मागील काही महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून खूनासारख्या गंभीर घटना घडत आहेत. अशीच एक घटना नागपूर शहरातून समोर आली आहे.

पैशाच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या करत मृतदेह जमिनीत पुरला. तब्बल ७ महिन्यानंतर कोराडी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे. विलास हिंगणकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी लहान भाऊ चंदन हिंगणकर आणि साथीदार ट्रकचालक मनोहर दुधभरवे या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत विलास आणि आरोपी चंदन हिंगनकर याचा ट्रक भाड्याने देण्याचा व्यवसाय होता.

मृत विलासला दारुचे व्यसन असल्याने त्याचे व्यवसायाकडे लक्ष नव्हते. याशिवाय तो पैशांचा हिशेब देखील देत नव्हता. काही दिवसांपूर्वी विलासची पत्नी देखील घर सोडून गेली होती. त्यामुळे विलास आणखीच दारुच्या आहारी गेला. (Latest Marathi News)

दरम्यान, व्यवसायात होत असलेल्या नुकसानीमुळे आरोपी लहान भाऊ अडचणीत आला होता. वारंवार समजून सांगूनही विलास दारूचे व्यसन सोडत नसल्याने आरोपी चंदन याने त्याचा काटा काढण्याचा प्लान आखला. ७ महिन्यांपूर्वी आरोपी चंदनने ट्रकचालक मनोहर दुधभरवे याच्या मदतीने विलासची हत्या केली.

हत्येनंतर आरोपींनी विलासचा मृतदेह कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुरादेवी शिवारात पुरुन टाकला. अचानक विलास बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, ७ महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

SCROLL FOR NEXT