Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : दुकानासमोर शिवीगाळ केल्याने हटकले; टोळक्याला घेऊन केले भयंकर कृत्य, घटना सीसीटीव्हीत कैद

Nagpur News : नागपूरच्या घास बाजार परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. यात ज्वेलरी दुकान चालक पद्माकर पराते हे दुकानात असताना याच्या दुकाना समोर रात्री संशयित आरोपी केशरीनंद नाईक हा शिवीगाळ करत होता

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: नागपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ज्वेलरी दुकानासमोर एकजण येऊन शिवीगाळ करत होता. त्याला दुकान मालकाने हटकले असता त्याचा राग आल्याने पाच- सहा जणांना सोबत घेऊन ज्वेलरी दुकानावर दगडफेक करत तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

नागपूरच्या घास बाजार परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. यात ज्वेलरी दुकान चालक पद्माकर पराते हे दुकानात असताना याच्या दुकाना समोर रात्री संशयित आरोपी केशरीनंद नाईक हा शिवीगाळ करत होता. यावेळी त्याला पराते यांनी हटकत शिवीगाळ करू नको असे सांगितले. यानंतर नाईक याला काही लोक त्याला घेऊन गेले. त्यानंतर आरोपी तिथेन निघून गेला आणि थोडावेळ तो काही युवकाना घेऊन परत आला. 

दुकानात येत केली तोडफोड 

दुकानासमोर शिवीगाळ करत असल्याने हटकवून झालेल्या वादानंतर पाच ते सहा टवाळखोरांना घेऊन आला. यानंतर त्याने ज्वेलर शॉपची तोडफोड केली. केशरीनंद नाईक असं मुख्य आरोपीचे नाव आहे. दुकानावर दगडफेक  केल्याने पद्माकर पराते यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांनी घेतले ताब्यात 

दरम्यान दुकानाची तोडफोड करण्यासोबतच नाईक याने फिरीयादी पराते आणि त्याच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि दुकानावर दसगडफेक करत तोडफोड केली. याप्रकरणी पराते यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर यात गुन्हा दाखल करण्यात आला. या नंतर सर्व आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र घास बाजार परिसरातील या घटनेने गुंडांची वाढती दादागिरी वाढली हे पुढे येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT