Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: नागपुर हादरले; 24 तासात तिघांची हत्‍या

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर शहर व परिसरात क्राईम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याच दरम्‍यान मागील चोवीस तासात नागपूर शहरात दोन तर (Nagpur) नागपूर ग्रामीण परिसरात एक, अशा तीन खूनाच्‍या घटना घडल्‍या आहेत. तिन्ही प्रकरणात आरोपींना अटक करण्यात (Police) पोलिसांना यश आले आहे. (Live Marathi News)

हत्येची (Crime News) पहिली घटना ही पाचपावल पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या लष्करीबाग भागात घडली आहे. रोहन शंकर बिहाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री साडेबारा वाजताच्या (Nagpur Crime) सुमारास तिघांनी चाकु आणि लोखंडी रोड रोशनवर हल्ला केला. ज्यामध्ये रोहनचा मृत्यू झाला आहे. आरोपी वीरेंद्र उर्फ बाबू बकरी, यशोदास उर्फ सॅनकी आणि अश्विन या तिघांसोबत रोहनचा तिघांसोबत वाद सुरू होता. रात्री रोहन वस्तीत बाहेर हात शेकत असताना त्यांच्यात जुना वाद उफाळून आला आणि याच वादातून तिघांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

दुसरी घटना नागपूरच्या इमामवाडा भागात घडली. दोघांनी मिळून एकाची हत्या केली. रामसिंग ठाकूर असे मृतक इसमाचे नाव आहे. किरकोळ वादातून दोन मजुरांनी संगनमताने रामसिंगची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतक रामसिंग ठाकूर आणि आरोपी राजू बुरडे मुकेश अंबुरे हे तिघेही मजूर असून इमामवाडा येथील झोपडपट्टीत एकत्र राहत होते. तिघांना दारूचे व्यसन असून क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या डोक्यावर वार केले. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी रामसिंगचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

तिसरी घटना ही नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीच्या टाकळघाट परिसरातील गंगापूर शिवारात झाली आहे. सुनील गुलाबराव भजे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. सुनील पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी लोखंडी रोडने हल्ला करून त्यांची हत्या केली. दिलीप गेडाम आणि वंश उर्फ दादू मांजी असे आरोपींचे नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : राजेंद्र गावित यांचा भाजप प्रवेश, पालघरमध्ये शिंदे गटाला धक्का

Rupali Chakankar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या आरोपावर चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया

Akola Crime News: सासू सतत घ्यायची चारित्र्यावर संशय; संतापलेल्या जावयानं कायमचं संपवलं, नेमकं काय घडलं ?

Solapur Lok Sabha Election | सोलापूरमध्ये EVM मशीन बिघडली, मतदारांचा खोळंबा

Kharif Crop Loan : खरीप हंगामासाठी पीक कर्ज; शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा

SCROLL FOR NEXT