Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार; नागपूरच्या मानकापूर परिसरातील पहाटेची घटना

Nagpur News : नागपूरच्या मानकापूर परिसरात पहाटे चार वाजताचा सुमारास सदरची घटना घडली आहे. मानकापूर परिसरात पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन आहे. सदरचे मशीनच लांबविण्यात आले आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लांबविल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र नागपूरमध्ये एटीएम मशीन न तोडता हे मशीन गाडीमध्ये टाकून चोरटे पसार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सुमारे साडेसात लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. या चोरट्यांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

नागपूरच्या मानकापूर परिसरात पहाटे चार वाजताचा सुमारास सदरची घटना घडली आहे. मानकापूर परिसरात पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन आहे. सदरचे मशीनच लांबविण्यात आले आहे. दरम्यान सकाळी परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत सीसीटीव्ही तपासून तपासाला सुरवात केली आहे. 

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
नागपूरच्या मानकापूर चौकातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी छोटा मालवाहू वाहनात टाकून पसार झाले आहेत. एटीएममध्ये सात लाख ५८ हजाराची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर एटीएम मशीन नेताना तीन आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून मानकापूर पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

चोरट्यांची हिंमत वाढली 

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा पत्रा कापून त्यातील रोकड लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र नागपूर शहरात एटीएम मशीन चोरी करण्यात आले आहे. यासाठी थेट गाडी घेऊन चोरटे आले होते. अर्थात नेहमी गजबजलेल्या परिसरात हि घटना घडल्याने खळबळ उडाली असून या चोरट्याने शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल

पुणेकरांचा प्रवास होणार गारेगार; इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच सेवेत, कोणत्या मार्गांवर धावणार जाणून घ्या

Maharashtra Live News Update: वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

Bhel Recipe: तोंडाला पाणी सुटलं ना? मग आजच बनवा ही चटपटीत 'ओली भेळ'

Moti jewellery Designs: अस्सल पारंपारिक सौंदर्य येईल खुलून, मोत्यांच्या दागिन्यांचे 6 ट्रेडिंग आणि युनिक पॅटर्न

SCROLL FOR NEXT