Nagpur Crime News Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: स्कूटीवर लिफ्ट देवून विद्यार्थीनी- महिलांशी करायचा अश्लिल चाळे; ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अटक

आरोपी याबाबत कोणाला सांगितलं तर ठार मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे घाबरलेल्या महिलांनी या संदर्भात पोलीस तक्रार केली नाही.

संजय डाफ

Nagpur Crime News: नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनी व महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनी व महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नागपूरच्या (Nagpur) बेलतरोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पांडुरंग दांडेकर असून असे आरोपीचे नाव असून तो पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी आहे.

गेल्या काही दिवसांपासून आरोपी पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवाने बेलतरोडी परिसरात पायी जाणाऱ्या महिला व मुलींना हेरायचा. तसेच लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा. धक्कादायक म्हणजे याबाबत कोणाला सांगितलं तर ठार मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे घाबरलेल्या महिलांनी या संदर्भात पोलीस तक्रार केली नाही.

मात्र काही दिवसा अगोदर 16 वर्षीय विद्यार्थिनीशी त्याने अशाच पद्धतीचे अश्लील चाळे केले. विद्यार्थिनीने घडलेला हा प्रकार घरी सांगितला आणि आरोपीचे बिंग फुटले. पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण बेलतरोडीतील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. ज्यानंतर आरोपीला सापळा रचत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT