Nagpur Crime news Saam Tv News
महाराष्ट्र

MBBSच्या विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं; बाथरूममध्ये गळफास घेतला, कारण अस्पष्ट

Nagpur Crime news: नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एमबीबीएस अंतिम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. घरातील बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून गळफास लावून त्यानं आयुष्य संपवलं. दरवाजा तोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. सोनगाव पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

संकेत दाभाडे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो एम्स हॉस्पिटलमध्ये शेवटच्या वर्गात शिकत होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या खोलीत गेला. त्यानंतर शाल घेऊन बाथरूममध्ये गेला. बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून त्यानं गळफास घेत आत्महत्या केली. मागील २ दिवसांपासून त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता.

संकेत काही घराबाहेर आलाच नाही, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. खोलीमध्ये कोणतीही हालचाल नव्हती. कोणताही आवाज येत नव्हता. संकेत दिसला नाही म्हणून इतर विद्यार्थ्यांना संशय आला. त्यांनी या संदर्भातील माहिती वार्डनला दिली. वार्डनने संकेतच्या खोलीचा दरवाजा तोडला.

तसेच बाथरूमचाही दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर वार्डनने सोनेगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचा तपास करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. तरूणानं आत्महत्या का केली? आयुष्य संपवण्याचामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT