nagpur crime news  Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : नागपुरात खळबळ! मजुरी करणाऱ्या व्यत्तीने रागात पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य

नागपुरात पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : नागपुरातून धक्कादायक बातमी हाती आली आहे. नागपुरात पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरातील आंबडी भागात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी करून उदरिर्वाह करणाऱ्या पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. नागपूरच्या (Nagpur) आमडी भागात ही घटना घडली आहे.

मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच खोलीत आत्महत्या केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमडी येथे घडली. कुसूम युवनाती असे मृत पत्नीचे तर मधुकर युवनाती असे आरोपी पतीचे नाव आहे. (Maharashtra Latest News)

नेमकं काय घडलं?

नागपुरात आमडी भागात कुसूम युवनाती या त्यांच्या पती मधुकर युवनातीसोबत राहत होत्या. या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. मधूकर दारूच्या नशेत असल्याने त्याने पत्नी कुसूमच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. या जीवघेण्या हल्ल्यात पत्नी कुसूमचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती मधूकरने आत्महत्या केली.

ही धक्कदायक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात आमडी गावात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघे पती-पत्नी मूळचे मध्यप्रदेशचे आहेत. दोघे मजुरीसाठी रामटेकला आले होते. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी (Police) पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT