Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: नाश्‍ता करताना वाद; भर रस्‍त्‍यावर केली हत्‍या

नाश्‍ता करताना वाद; भर रस्‍त्‍यावर केली हत्‍या

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत भर दिवसा रस्त्यावर एकाची हत्या (Crime News) झाल्‍याची घटना घडली आहे. आरोपी आणि मृतकात वाद झाल्याने शुल्लक कारणावरून हत्या झाली असून पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. (Breaking Marathi News)

नागपूरच्‍या (Nagpur) सदर पोलिस स्‍टेशन हद्दीत सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आरोपी आणि मृतक प्रणय पात्रे एका टपरीवर बसून नाश्ता करत होते. या दरम्‍यान त्यांच्यात शुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. यानंतर दोघांनी एकमेकांसोबत मारपीट (Nagpur Crime) करायला सुरुवात केली. मारपीट करत असताना आरोपीने आपल्या खिशातील चाकू काढून मृतकाच्या पोटात खुपसला. रक्तबंबाळ झालेल्या मृतकाचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून तपास सुरू

भर रस्त्यात झालेल्या या हत्‍येमुळे खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य बघता पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी पोहोचला आणि हत्येच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. तसेच आरोपीचा शोध देखील सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT