Nagpur Husband Wife Death News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: प्रेमविवाहाचा भयानक अंत! आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:ही घेतला गळफास; धक्कादायक कारण उघड

Nagpur Husband Wife Death News: सोनिया मंडाले असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून राजेश मंडाले, असं आरोपी पतीचं नाव असून त्यानेही आत्महत्या केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Husband Wife Death News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे अनैतिक संबंध आणि पती पत्नीच्या भांडणातून घडत आहेत. अशीच एक घटना नागपूर (Nagpur Crime News) शहरातून समोर आली आहे. नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये वाद झाला.

क्षणार्धात वाद इतका विकोपाला गेला, की पतीने पत्नीच्या (Husband And Wife) डोक्यात लोखंडी हातोड्याने वार केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही स्वत: गळफास लावत आपली जीवनयात्रा संपवली. थरकाप उडवणारी ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास सदर पोलीस ठाणे परिसरात घडली.

सोनिया मंडाले असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून राजेश मंडाले, असं आरोपी पतीचं नाव असून त्यानेही आत्महत्या (Crime News) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मॉइल वसाहतीत राहणाऱ्या राजेश आणि सोनिया यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, दोघांमध्ये वाद सुरू झाला.

राजेश हा कर्करोगाने ग्रस्त होता, त्याच्यावर नागपूरात उपचार सुरू होते. तो नेहमी पत्नी सोनिया हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रविवारी राजेश आणि सोनिया यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर बाचाबाचीत झाले. यातून राजेशने सोनियाच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने जोरदावर वार केला.

या घटनेत सोनियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आपल्या हातातून पत्नीची हत्या झाल्यानंतर राजेशला संताप अनावर झाला. त्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT