Nagpur Love Triangle Murder Case Gurav Ragade  Saam tv
महाराष्ट्र

Crime News : त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हिस्ट्रीशीटर गौरवची हत्या, मित्रानेच केला गेम; नागपुरातील खळबळजनक घटना

Nagpur Murder Case News : नागपुरातील नरेंद्रनगरच्या सुंदरबन परिसरात त्रिकोणी प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. बेलतरोडी पोलिसांकडून तपास सुरू असून दोन संशयित ताब्यात आहेत.

Alisha Khedekar

  • त्रिकोणी प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट

  • नरेंद्रनगरातील सुंदरबन नाल्याजवळ झटापटीदरम्यान हिस्ट्रीशीटरची हत्या

  • आरोपींविरोधात गुन्हा दाखल

  • पोलीस तपास सुरु

नागपुरात त्रिकोणी प्रेमप्रकरणातून एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नरेंद्रनगरातील सुंदरबन परिसरात गौरव रगडे याच्यावर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत गौरव रगडे याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोड्यासह तब्बल नऊ गंभीर गुन्हे दाखल होते. दोन आठवड्यांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. दरम्यान, रगडेचे एका तरुणीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच तरुणीसोबत रगडेचा मित्र गौरव राऊत याचेही संबंध असल्याचे समोर आले. यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. काही दिवसांपासून हा वाद वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेच्या दिवशी संबंधित तरुणी गौरव राऊतच्या घरी पार्टीसाठी गेल्याची माहिती रगडेला मिळाली. यानंतर संतापलेल्या रगडेने राऊतच्या घरावर दगडफेक करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. परिस्थिती चिघळल्यानंतर राऊत आणि त्याचे मित्र घराच्या मागील दरवाजातून बाहेर पडून जीव वाचवण्यासाठी पळाले. रगडेने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर सुंदरबन नाल्याजवळ रगडे आणि राऊत यांच्यात जोरदार झटापट झाली.

या झटापटीदरम्यान रगडेच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्यावर वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रगडे गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी गौरव राऊत आणि अभिषेक वासनिक या दोघांना ताब्यात घेतले आहे. नेमक्या कोणत्या कारणातून आणि कशा पद्धतीने हत्या झाली, याचा तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे नरेंद्रनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT