मृतक - तुषार  मंगेश मोहिते
महाराष्ट्र

Nagpur Crime : गाण्याचा गायक कोण? यावरून मित्रांनी केली मित्राची हत्या! पहा VIDEO

पार्टी मध्ये गाणं वाजवत असताना या गाण्याचा गायक कोण यावरून दोन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला. हे तीन मित्र ज्या फ्लॅट वर पार्टी करत होते, तो त्यांच्या एका मैत्रिणीचा असून पुढील तपास पोलीस करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : नागपूरात शहरात शुल्लक कारणावरुन हत्या होण्याचे सत्र सुरूच असून, आज त्यात नव्याने एका हत्येची भर पडली आहे. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री झालेली हत्या, आज सकाळी उघडकीस आली आणि अतिशय शुल्लक कारणावरून मित्रांनीच त्याच्या मित्राची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरच्या केडीके (KDK) कॉलेज येथे काल रात्री मित्राच्या फ्लॅटवर तीन मित्रांनी पार्टी आयोजित केली होती.

हे देखील पहा :

या पार्टी मध्ये गाणं वाजवत असताना या गाण्याचा गायक कोण यावरून दोन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला. पार्टी संपल्यानंतर आरोपी आणि मृतक घरी जायला निघाले. घराजवळ पोहचले असता, परत त्यांचात त्याच गाण्याच्या गायकावरून वाद झाला. वादानंतर आरोपीने घरी जाऊन चाकू आणला त्यानंतर आरोपीने मृतक तुषार वर चाकूने वार केले. यात तुषार जखमी झाला. आरोपीने त्याच अवस्थेत तुषारला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आकाश गोंड असे आरोपीचे नाव आहे.

मात्र, त्याचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. आरोपी आकाश गोंड आणि त्याचा मित्र याला पोलीसानी ताब्यात घेतले याच आरोपीच्या नावे दोन गुन्हे अजूनही दाखल आहेत. हे तीन मित्र ज्या फ्लॅट वर पार्टी करत होते, तो त्यांच्या एका मैत्रिणीचा असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Local Body Election : निवडणुकीआधी शरद पवारांना जोरदार धक्का, २ विश्वासू शिलेदारांचा राष्ट्रवादीला रामराम

Ajit Pawar setback : अजित पवारांना जोरदार धक्का, ४३ पदाधिकार्‍यांचा एकच वेळी 'जय महाराष्ट्र', निवडणुकीआधी राष्ट्रवादीला खिंडार

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला मंजूरी तर मिळाली, पण कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख वाचा

Election News : राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका? पुढील आठवड्यात बिगुल वाजणार ? | VIDEO

SCROLL FOR NEXT