Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Firing Case : राज्यात चाललंय काय? नागपुरात दिवसाढवळ्या एकाची गोळ्या झाडून हत्या

Nagpur Firing News : राज्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. नागपुरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने नागपूर हादरून गेलं आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Firing News :

राज्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. नागपुरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने नागपूर हादरून गेलं आहे. नागपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात एकाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे. घरात घुसून काहींनी गोळ्या झाडल्या आहेत. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपुरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजनगर या भागात ही घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हत्या झालेला व्यक्ती जुना प्रेस फोटोग्राफर असल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने काम सोडून अनेक वर्षे झाले आहे. विनय पूनेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

नेमकं काय घडलं ?

नागपुरातील गोळीबाराने शहर हादरून गेलं आहे. या नागपुरात झालेल्या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. व्यक्ती घरात बसला होता. त्यावेळी काही जण त्याच्या घरात शिरले. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. ते काही वर्षांपूर्वी प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.

नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी घुसूनच त्यांची हत्या करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT