Nagpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: कोळसा व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, सात लाखांची खंडणीही मागितली, नागपूर शहरात खळबळ

Nagpur Latest News: कोळसा व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत सात लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संजय डाफ

Nagpur Crime News: नागपूर शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चार दिवसांपूर्वीच शहरात कौटुंबिक वादातून सुनेने सासूची हत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता एका कोळसा व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत सात लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरात (Nagpur) कोळसा व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत सात लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनव अग्रवाल असे या कोळसा व्यापाऱ्याचे नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे फारुख शेख अब्दुल शेख असे खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव असून तो नुकताच तडीपारच्या कारवाईमधून सुटला आहे. सुटका होताच त्याने कोळसा व्यापारी अभिनव अग्रवाल यांना जीवे मारण्याची धमकी देत सात लाखांच्या खंडणीची मागणी केली.

नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील पडोळे नगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यात कॉकरोज पार्टीचे आंदोलन होणार, अभिजीत दिपकेंनी दिली माहिती

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

SCROLL FOR NEXT