Nagpur Crime News:  Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: खळबळजनक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात गतीमंद कैद्यावर लैंगिक अत्याचार

Nagpur News: या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली असून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

संजय डाफ

Nagpur Crime News: नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोक्सोच्या आरोपीवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. न्यायालयात सुनावणी दरम्यान पिडीतेने अत्याचार झाल्याची माहिती दिली. या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली असून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Crime News in Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदांतर्गत (पोक्सो) न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीवर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

न्यायालयीन सुनावणी सुरू असताना आरोपीने ही आपबिती कथन केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवून विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीची वैद्यकीय चाचणीकरिता आज दुपारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश धंतोली पोलिसांना दिले आहेत.

पिडीत गतिमंद असल्याने कारागृहातील रुग्णालयात तो उपचारासाठी गेला होता. यावेळी औषध देण्याच्या बहाण्याने तोंड दाबून तेथील एका कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा दावा आरोपीने केला आहे. तसेच मारहाण करण्यात आल्याचेही आरोपीने सांगितले आहे. याबाबत न्यायालयाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

SCROLL FOR NEXT