Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

महिलेला ब्‍लॅकमेल करत शारीरिक सुखाची मागणी; व्‍यापाऱ्याला अटक

महिलेला ब्‍लॅकमेल करत शारीरिक सुखाची मागणी; व्‍यापाऱ्याला अटक

मंगेश मोहिते

नागपूर : महिलेला ब्लॅकमेल करून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या एका हार्डवेअर दुकान चालवणाऱ्या व्यापाराला जरीपटका (Police) पोलिसांनी अटक केली आहे. 58 वर्षीय इंद्रदेव घनसानी असे आरोपीचे नाव आहे. (Tajya Batmya)

जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीत सांगितल्याप्रमाणे (Nagpur News) पोलीस स्टेशन हद्दीतील पीडित महिलेला आरोपीने फोन करून आपल्या दुकानात बोलावले. महिला दुकानात पोहोचली तेव्हा या महिलेला आरोपीने काही ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवले. या महिलेचे आणि काही लोकांशी (Crime News) अनैतिक संबंध असल्याचा हा पुरावा असल्याचे महिलेला आरोपीने सांगितले. ऑडिओ क्लिप वायरल करून समाजात बदनामी केली जाईल असे आरोपीने महिलेला धमकावले आणि शरीर सुखाची मागणी केली.

एक लाखाची मागणी

जर ऑडिओ क्लिप वायरल करायची नसेल, तर एक लाख रुपये द्यावे लागेल अशी मागणी आरोपीने महिलाकडे केली. या संपूर्ण प्रकरणात घाबरलेल्या महिलेने आधी पोलीस स्टेशन गाठले. या संदर्भात तक्रार दाखल केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी घनसानी विरोधात वसुली, ब्लॅकमेलिंग करणे आणि धमकावण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात हनी ट्रॅपचा काही संबंध आहे का? काही व्यापारी आणि दुकानदार यांच्याकडे महिलांना पाठवून त्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून धमकावल्याचे आणखी काही प्रकरण आहे का? या संदर्भातही पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोरगावच्या मोतीलाल नगर पुनर्विकासावरून राजकीय ठिणगी; राहिवाशांचा भाजप पदाधिकाऱ्यांवर आरोप

Maharashtra News Live Update: सोलापूर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात

नेत्यांच्या बेडरूममध्ये गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत; खासदार पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान

Crime News: नंबर ब्लॉक केला, दुसऱ्याच मुलाशी केली मैत्री; रागाच्या भरात बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT