Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

ATM Theft in Nagpur: रात्री रस्त्यावर वर्दळ नसल्याचे पाहून चोरट्याने एटीएमच्या केबिनमध्ये प्रवेश केला. यानंतर मशिनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : रात्रीच्या सुमारास एटीएम मध्ये प्रवेश करून मशीनमधील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सदर प्रकार लक्षात आला. यावेळी चोरट्याचे हे कृत्य मोबाईलमध्ये कैद करण्यात आले असून नागरिकांनी सतर्कता दाखवत चोरट्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यानंतर चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

नागपूर शहरातील ऑटोमोटिव्ह चौकात असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएममधून पैसे चोरी करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एकाला कपिल नगर पोलिसांनी अटक केली. चेतन उईके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ नसल्याचे पाहून चोरट्याने एटीएम मशीनच्या केबिनमध्ये प्रवेश केला. यानंतर त्याने मशिनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न सुरु केला होता. दरम्यान परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. 

नागरिकांनी रंगेहाथ पकडले 

सराईत आरोपीने एटीएम फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न अयशस्वी झाला. एटीएम मधून पैसे काढत असताना नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडले. तर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी येत पैसे चोरणाऱ्यास ताब्यात घेतले आहे. 

चोरटा सराईत गुन्हेगार 
सदर आरोपी हा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील रहिवासी आहे. तो सराईत गुन्हेगार असून तो नागपुरात हिंगणा येथे आपल्या बहिणीकडे राहत होता. चोरीच्या उद्देशाने तो नागपूर शहरात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान त्याचा सोबत आणखी कोणी होतं का? याचा तपास पोलीस करीत आहे. आरोपीला पकडून कपिल नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राष्ट्रवादीच्या आमदाराचे ८ सवाल

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

T20 World Cup 2026: 'या' चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटला सामना; पराभवानंतर सूर्यादादा संतापला

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT