Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणाीवर; टवाळखोरांकडून महिला पेट्रोल पंप मालकाला धमकी Video

Nagpur News : शिवीगाळ केली. पेट्रोल पंप फोडून टाकू. अशी शिवीगाळ करत धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या सदर पेट्रोल पंप चालक महिलेने राजेश मिश्रा यांच्यासह सर्वांची माफी मागितली. दहशत कायम राहावी यासाठी व्हायरल केला

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांवर कुत्रा भुंकण्याचा कारणावरून वाद झाला होता. हा प्रकार नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत इलेक्ट्रॉनिक झोन चौकातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर घडला होता. दरम्यान पंप मालक महिलेला काही टवाळखोरानी माफी मागायला लावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसांऐवजी आता टवाळखोरांची भीती नागपूर शहरात वाढली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

प्राप्त माहितीनुसार नागपूरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपावर १८ तारखेला संध्याकाळी दोघे जण आले असता पेट्रोल भरताना कुत्रा भुंकला. त्यानंतर एकाने चप्पल फेकून मारली. या शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पेट्रोल भरणारे दोघे जण निघून गेले होते. काही वेळानंतर स्थानिक राजेश मिश्रासह पाच ते सहा जण परत आले आणि पुन्हा वाद झाला.

दरम्यान पेट्रोल पंपावर आलेल्या राजेश मिश्रा याने सोबत असणाऱ्यांनी शिवीगाळ केली. पेट्रोल पंप फोडून टाकू. अशी शिवीगाळ करत धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या सदर पेट्रोल पंप चालक महिलेने राजेश मिश्रा यांच्यासह सर्वांची माफी मागितली. तर संबंधितांनी माफी मागण्याचा हा व्हिडिओ बनवून दहशत कायम राहावी यासाठी व्हायरल केला असल्याचे बोलले जात आहे. 

७ जणांवर गुन्हा दाखल 

सदरच्या व्हिडिओत महिला मला माफ करा अशी म्हणताना दिसून येत आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत ७ जणांना अटक केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी साम टिव्हीशी बोलताना दिली. मात्र अशा पद्धतीने एखाद्या महिलेला माफी मागायला लावत भीती निर्माण करण्याचा प्रकार घडत असतील; तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT