Nagpur Police Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: वीस लाख लुटणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश; १४ लाखाची रक्‍कम हस्‍तगत

वीस लाख लुटणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश; १४ लाखाची रक्‍कम हस्‍तगत

मंगेश मोहिते

नागपूर : लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका व्यक्तीवर दरोडा टाकत वीस लाख रुपये लुटणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आले. पोलिसांनी (Police) या प्रकरणात आठ आरोपींना ताब्यात घेतले असून 14 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. नागपुरातील या मोठा दरोड्याचा (Robbery) खुलासा आज पोलिसांनी केला. (Nagpur Crime News)

नागपूरच्या (Nagpur) लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यापाऱ्याचा कर्मचारी दिवसभराच्या धंद्याचे पैसे घेऊन लॉकरमध्ये जमा करण्यासाठी निघाला होता. या दरम्‍यान पाच ते सहा जणांनी त्याच्यावर भर रस्त्यात हल्ला (Crime News) चढविला आणि त्याच्याजवळ असलेले वीस लाख रुपये कॅश लुटली. घटनास्थळावरून आरोपी फरार झाले. मात्र घटना मोठी असल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला.

१४ लाख कॅश हस्‍तगत

सीसीटीव्हीचा आधार घेत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की काही लोक बॅगमध्ये कॅश घेऊन जात आहे. त्यावरून पोलीस आणि क्राइम ब्रांचने सापळा रचला आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विचारपूस आणि तपास केला असता त्यांच्याजवळ 14 लाख रुपये नगदी कॅश मिळून आली. ती पोलिसांनी हस्तगत केली आहे.

टीपच्‍या आधारावरच दरोडा

संपूर्ण दरोड्याचा प्रकार टीपच्या आधारावर झाला असल्याचे सुद्धा पोलिसांच्या तपासात पुढे येते. ज्या ऑफिसची ही कॅश होती तिथल्याच कोणीतरी ही टीप दिलेली असावी अशी शक्यता सुद्धा पोलिसांनी वर्तवली आहे. या दरोडेखोरांनी दरोड्याच्या आधी संपूर्ण परिसराची रेकी केली होती आणि संधी साधत दरोडा घातला. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार असून आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT