Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : विमानाच्या कार्गो पार्सल सेवेतून गांजा तस्करी; नागपूर येथे १० किलो गांजा जप्त

Nagpur News : गांजासारख्या अंमली पदार्थाची तस्करी सुरूच असल्याचे प्रकार नागपूरमध्ये झालेल्या कारवाईत समोर आला. विमानसेवा पार्सलच्या माध्यमातून गांजा तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : गांजा तसेच अंमली पदार्थांची वाहतूक विक्री करण्यास बंदी असताना चोरून गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी तर चक्क विमानाच्या कार्गो पार्सल सेवेच्या माध्यमातून तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्गोच्या पार्सलमधून नागपूर येथून तब्बल १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. 

गांजासारख्या अंमली पदार्थाची तस्करी सुरूच असल्याचे प्रकार नागपूरमध्ये झालेल्या कारवाईत समोर आला आहे. विमानसेवा पार्सलच्या माध्यमातून गांजा तस्करी करण्यात येत असल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत गांजा तस्करी रेल्वे मार्गे किंवा रोडच्या मार्गे व्हायची. आता मात्र गांजा तस्करी ही विमानाचा मार्ग होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

खरड्याच्या बॉक्समध्ये पॅकिंग 

ओडिसावरून उत्तरप्रदेशला जाणाऱ्या पार्सलमध्ये गांजा नेला जात होता. नागपूरच्या कार्गो मधून जातांना हा प्रकार उघडकीस आला आहे. खरड्याच बॉक्समधून गांजा पॅक होऊन जात होता. यात काही संशयास्पद असल्याने विमानतळवर तपासणी झाली. यात हा प्रकार समोर आला. दरम्यान सोनेगाव पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पोहचून तपासणी केली. पार्सल उघडलं असता गांजा त्यात मिळून आला.  

पार्सल पाठविणाऱ्याची होणार चौकशी 

याप्रकरणी सोनेगाव पोलिसानी अमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पार्सल पाठविणाऱ्याचा ओडिशासावरील व्यक्तींचा आणि उत्तर प्रदेशच्या पत्त्यावर राहत असलेल्या व्यक्तीचा तपासाला सुरवात केली आहे. मात्र ओरिसा वरून निघालेले पार्सल नागपूरपर्यंत पोहचल असताना यात कुठलीच तपासणी झाली नाही का? नागपुरात संशयाचा आधारावर तपासणी केली म्हणून हा प्रकार उघडकीस आला. यापूर्वी असा प्रकार झाला तर नाही ना अशीही शंका आता व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT