दारुची नशा जिवावर बेतली! किरकोळ वादातून तरुणाची अमानुष हत्या Saam TV
महाराष्ट्र

दारुची नशा जिवावर बेतली! किरकोळ वादातून तरुणाची अमानुष हत्या

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारपुरा परिसरात एका इसमची हत्या झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

(मंगेश मोहिते)

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारपुरा परिसरात एका इसमची हत्या झाली आहे. मृतक हा बेघर असून तो कुंभारपुरा या ठिकाणी कचरा वेचण्याचे काम करायचा. त्यामुळे त्याला घंटी नावाने ओळखले जायचे. घंटीचा खून मनोज नामक कचरा वेचणाऱ्या इसमाने दारूच्या नशेत केला आहे. पोलिसांनी मनोजला अटक केली आहे. आरोपी मनोज भोजने हा देखील कचरा वेचण्याचे काम करत होता, दोघांमध्ये वाद झाला असता आरोपीने घंटीच्या डोक्यावर वीट मारून त्याची हत्या केली.

मृतक घंटी हा दिवसभर कचरा वेचून मिळणाऱ्या पैश्यातून स्वतःचे पोट भरायचा तर आरोपी मनोज सुद्धा कचरा वेचायचा, त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. काल रात्री कुंभारपुरा परिसरातील शास्त्री गार्डन जवळ मनोज आणि घंटी यांच्यात वाद झाला. त्यावेळी मनोज हा दारूच्या नशेत होता. दोघांमध्ये सुरू असलेला वाद इतका विकोपाला गेला की मनोज ने दारूच्या नशेत घंटीच्या डोक्यावर सिमेंटच्या विटांचा मारा केला,ज्यामध्ये घंटीच्या जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती समाजताच पाचपावली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतकाची ओळख पोलिसांनी घंटी म्हणून पटवली, त्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मनोजचा शोध सुरू केला तेव्हा तो घटनास्थळा पासून काही अंतरावर दारूच्या नशेत लोळत पडलेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर दारूची झिंग उतरल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट येण्याच्या १० मिनिटं अगोदर दिसतात ही लक्षणं; वाचा कसा वाचवू शकाल जीव?

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

विद्यार्थी नागपूरचा अन् नीट परीक्षेचं केंद्र अबुधाबीत; पेपरफुटीनंतर NTAचा आणखी गजब कारभार

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

SCROLL FOR NEXT