Nagpur Crime: मित्राच्या प्रेयसीला लॉजवर नेऊन दोघांनी केला बलात्कार  - Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: मित्राच्या प्रेयसीला लॉजवर नेऊन दोघांनी केला बलात्कार

मित्राच्या प्रेयसीला वेगवेगळे आमिष दाखवून लॉजवर नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूरात समोर आली आहे

Amit Golwalkar

नागपूर : मित्राच्या प्रेयसीला वेगवेगळे आमिष दाखवून लॉजवर नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूरात समोर आली आहे. त्यानंतर तिला देहव्यापारात ढकलत तिच्या देहाचाही सौदा केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या (Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने पाच आरोपींना अटक केलीआहे. (Nagpur Crime Capital Five arrested for sexual assault on girl)

विशाल उर्फ दत्तू दाभणे ऊर्फ खाटीक, सत्यजित ऊर्फ निखिल बांगड, सचिन इंगळे, आकाश ऊर्फ विक्की भोसले अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, तर अमित लोखंडे हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, पाचही आरोपी हे एकमेकांचे मित्र असून, त्यांनी दहावीत असलेल्या मुलीला देहव्यवसाय करून घेण्यासाठी नागपुरात (Nagpur) आणल्याचे उघड झाले आहे.

यातील मुख्य आरोपी विशाल कुख्यात आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाच्या २८ गुन्ह्यांची नोंद आहे. सचिनवरही गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे आहेत. विशालचा एक मित्र जवळच्या गावात राहतो. त्याच्या मैत्रिणीची विशालसोबत ओळख झाली. ती खाजगी काम करायची. या माध्यमातून तिची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. विशालने या दोघींनाही नागपुरात नोकरी आणि पैशाचे आमिष दाखविले.

आमिषाला बळी पडताच दोघींनाही नागपुरात आल्या. त्यांना काही दिवस विशालने आपल्या घरी ठेवले . सत्यजित आणि सचिन यांनी मुलींना हुडकेश्वरातील लॉजवर नेऊन दोघांनी एकीवर बलात्कार केला तर दुसरीवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मित्राच्या प्रेयसीसाठी ग्राहक शोधायला लागला. अशाप्रकारे दोन्ही मुलींना विशालने देहव्यापाराच्या दलदलीत लोटले. आरोपी आकाश आणि अमितने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

(Edited By - Amit Golwalkar)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

Hantavirus Symptoms: 'हंटा व्हायरस' म्हणजे काय? शरीरात कसा परसतो? 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

SCROLL FOR NEXT