NAGPUR CHLORINE GAS LEAK saam tv
महाराष्ट्र

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

Chlorine Gas Leak Sparks Panic in Nagpur, 40 Hospitalised: नागपूरमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती झाली आहे. या दुर्घटनेत त्रास झाल्याने 40 नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेवरुन स्थानिकांच्या काय प्रतिक्रीया आहेत ? हा प्रकल्प भरवस्तीत का उभारला? पाहूया या रिपोर्टमधून

Girish Nikam

नागपूरजवळच्या गोधणीमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती झाली. यात 900 किलो क्षमतेच्या सिलिंडरमधून गॅस पसरल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसह सुमारे 40 नागरिकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. प्रकल्पाच्या जवळ असलेल्या रहिवाशांनाही मध्यरात्री गाढ झोपेत अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे परीसरात भितीचं वातावरण निर्माण झालं. काही मुली आणि महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अखेर अग्निशमन दल आणि NDRFच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले.

गोधनी शहराला शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या वतीने हा प्लांट उभारण्यात आला होता. मात्र जलशुद्धीकरण प्रकल्प नागरी वस्तीत कसा ? याची संपूर्ण चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होतेय.

नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये पाच महिन्यापूर्वी स्फोटक निर्मिती कारखान्यात स्फोट झाला होता. या दुर्घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाला होता. आता गोधनीमधील दुर्घटनेमुळे नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT