Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

Surabhi Jayashree Jagdish

सोयीसाठी सीट बदलण्याचा प्रयत्न

कारमध्ये प्रवास करताना अनेक जण सोयीसाठी धावत्या गाडीत आपली सीट बदलण्याचा प्रयत्न करतात. प्रवासात आरामदायी जागा मिळावी किंवा दुसऱ्या व्यक्तीजवळ बसता यावं, यासाठी असं केलं जातं. मात्र गाडी सुरू असताना सीट बदलणं टाळावं.

Moving vehicle safety | saam tv

लांबचा प्रवास

लांबच्या प्रवासात मागे बसलेले प्रवासी कधी कधी आपली जागा सोडून दुसऱ्या सीटवर जाण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा ते ड्रायव्हरच्या जवळच्या सीटवर किंवा दुसऱ्या बाजूच्या सीटवर जाण्यासाठी उठतात. गाडी सुरु असताना असं करणं सुरक्षित नसते.

Passenger safety | saam tv

सीट बदलणं धोकादायक ठरू शकतं

धावत्या कारमध्ये सीट बदलताना प्रवाशाला आपल्या जागेवरून उठावं लागतं. गाडीच्या हालचालीमुळे त्या वेळी शरीराचा तोल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे चालत्या गाडीत सीट बदलणं टाळावं.

Car travel precautions | saam tv

ड्रायव्हरचं लक्ष विचलित होऊ शकतं

सीट बदलताना प्रवासी पुढे किंवा मागे जात असल्याने ड्रायव्हरचे लक्ष त्या हालचालीकडे जाऊ शकते. अचानक होणारी ही हालचाल ड्रायव्हरला गाडी चालवताना त्रासदायक ठरू शकते.

Moving vehicle risks | saam tv

बॅलन्सवर परिणाम

गाडी चालू असताना प्रवासी एका सीटवरून दुसऱ्या सीटवर जाताना शरीराची हालचाल करतो. अशा वेळी गाडीच्या आत हालचाल वाढते आणि प्रवाशाचा तोलही बिघडू शकतो. त्यामुळे प्रवासात प्रत्येकाने आपापल्या सीटवर बसून राहणं अधिक सुरक्षित असतं.

Passenger injuries | saam tv

शरीराचा तोल जाणं

सीट बदलण्यासाठी प्रवाशाला आपल्या जागेवरून उठावं किंवा वाकावं लागतं. गाडीच्या वेगामुळे किंवा अचानक होणाऱ्या हालचालीमुळे त्या वेळी शरीराचं संतुलन बिघडू शकतं. म्हणून सीट बदलायची असल्यास गाडी थांबल्यानंतरच जागा बदलणं योग्य आहे.

Safe seating in car

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CNG fuel economy | saam tv