Nagpur Blast Threat: Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Blast Threat: बॉम्बस्फोटाच्या धमकीने नागपुरात खळबळ! अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ; पोलीस ठाणे केले रिकामे

Nagpur News: या घटनेने एकच खळबळ उडाली असून धमकीनंतर पोलिस ठाणे रिकामे करण्यात आले.

संजय डाफ

Nagpur News: नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील सीताबर्डी (sitabuldi Police Station) पोलिस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी फोनवरुन देण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून धमकीनंतर पोलिस ठाणे रिकामे करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर शहरातील (Nagpur) सीताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याचा एक निनावी कॉल आल्याने एकच खळबळ उडाली. या फोननंतर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारीही हादरुन गेले. धमकीचा कॉल (Threat Call) आल्याने सर्वांचीच धावपळ झाली तसेच तात्काळ संपूर्ण पोलिस स्टेशन रिकामे करण्यात आले.

मात्र ही धमकी म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचे लक्षात येताच अखेर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. सध्या या निनावी फोन करणाऱ्याचा शोध सुरू असून या कॉलरने हा फोन का केला असेल, याचा तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, राजकीय नेत्यानंतर आता थेट पोलिसांना धमकी देण्यापर्यंत मजल पोहोचल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपासून देशातील तसेच राज्यातील नेत्यांना फोनवरुन धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह शरद पवार (Sharad Pawar), संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही फोनवरुन धमकी देण्याचा प्रकार समोर आला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

SCROLL FOR NEXT