Nagpur Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Breaking News: डबा पार्टी जिवावर बेतली! मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Nagpur Latest News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. अशातच नागपुरच्या उमरेड तालुक्यातील मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ३१ मे २०२४

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. नागपुरमधून अशीच धक्कादायक घटना घडली असून उमरेड तालुक्यतील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत मटकाझरी तलावात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपुरमधील उमरेड तालुक्यतील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक लहान मुलगा आणि दोन पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या वाठोडा परिसरातील तीन कुटुंब मटकाझरी तलावर डबा पार्टी करण्यासाठी गेले होते. यावेळी गुरूवारी दुपारच्या सुमारास या कुटुंबातील तिघे तलाव्यात बुडाले होते. आज सकाळी या तिघांचेही मृतदेह सापडले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

दरम्यान, राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये बुडलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी निघालेली एसडीआरएफच्या जवानांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता तर वेंगुर्ले बंदरातही खलाश्यांची बोल उलटून चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन..

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार, ओम बिर्लांची घेतली भेट

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT