Nagpur Latest News Saamtv
महाराष्ट्र

Nagpur News: क्षणभर विश्रांती जिवावर बेतली! कापसाच्या ढिगाऱ्यावर झोपले अन् विपरीत घडलं; २ कामगारांचा मृत्यू

Nagpur Latest News: मशीन बंद पडून काम थांबल्याने हे दोघेही तरुण कापसाच्या ढिगार्‍यावर जाऊन झोपले. हीच क्षणभराची विश्रांती या कामगारांच्या जिवावार बेतली.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर |ता. १९ डिसेंबर २०२३

Nagpur News:

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या (Khapa Police Station) हद्दीत कनक कॉटन इंडस्ट्रीजमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून या दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील (Nagpur) खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कनक कॉटन इंडस्ट्रीज कंपनी आहे. सोमवारी (१८, डिसेंबर) जिनिंगचे काम सुरू असताना मशीन बिघाड झाल्याने काम बंद पडले. काम बंद पडल्याने बिरमराम देदाराम भिल, पंकज मंगिलाल भिल हे दोघेही कामगार आराम करत होते.

हे दोघेही तरुण कापसाच्या ढिगार्‍यावर जाऊन झोपले. हीच क्षणभराची विश्रांती या कामगारांच्या जिवावार बेतली. गाढ झोपेत असतानाच कापसाचा ढीग कोसळल्याने दोघेही त्याखाली दबून राहिले. त्यात गुदमरून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी जेव्हा इतर मजूर कामावर आले, तेव्हा त्यांना शंका आली आणि शोधा शोध सुरू झाली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी हे दोघेही कापसाच्या ढिगाऱ्यखाली मिळून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नागपूरमधील बाजारगाव येथील सोलार कंपनीत भीषण स्फोट (Blast in explosive Factory) झाला होता. या दुर्घटनेत ६ महिलांसह ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT