Nagpur BJP Women Leader Missing Sana Khan Missing Latest Marathi News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: भाजपची महिला कार्यकर्ता मध्यप्रदेशात गेली अन् गायब झाली; धक्कादायक घटनेनं नागपुरात खळबळ

BJP Women Leader Missing: नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील भाजपच्या महिला कार्यकर्त्या सना खान १ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur BJP Women Leader Missing: नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील भाजपच्या महिला कार्यकर्त्या सना खान १ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. सना खान मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामासाठी गेल्या होत्या, त्यानंतर त्या परतल्याच नाही. याप्रकरणी नागपूरच्या (Nagpur) मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी (Police) त्यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. १ ऑगस्ट रोजी त्या नागपूर येथून जबरलपूरला गेल्या होत्या.

मात्र, सना खान परतल्यातच नाही. त्यांचा फोनही लागत नाही. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांनी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल झाले आहे. मात्र, अद्यापही सना खान यांचा शोध लागलेला नाही.

पोलिसांनी त्यांच्या व्यावसायिक पार्टनरसोबत संपर्क साधल असता, तो सुद्धा बेपत्ता असल्याचं कळतयं. दरम्यान, सना खान नेमक्या गेल्या तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या आहेत.

त्यांची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांना अद्याप सना खान यांचा मृतदेह मिळालेला नाही, त्यामुळे या तर्काला कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला तसेच मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता नागपुरातील भाजपची महिला कार्यकर्ताच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT