nagpur  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : रक्तरंजित थरार! मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजप नेत्याची निर्घृण हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Nagpur crime news : नागपुरात भरदिवसा भाजप नेत्याची हत्या करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

भाजप वॉर्ड अध्यक्ष सचिन साहू यांची मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी हत्या

हत्येमागे जुन्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादाचा संशय

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

सचिन साहू यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ

पराग ढोबळे, साम टीव्ही

महाराष्ट्रातील सांगलीत दलित महासंघाच्या नेत्याची 'मुळशी पॅटर्न' स्टाइलने हत्या केल्याची घटना ताजी असताना आणखी एका नेत्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपुरात भाजप नेत्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्याची हत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर नागपुरातील भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. नागपुरातील यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांची धारधार शास्त्राने वार करून हत्या करण्यात आली. सचिन साहू असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे.

सचिन साहू हे उत्तर नागपुरातील वॉर्डाचे अध्यक्ष होते. जुन्या पैशांच्या देवाण घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. सचिन यांच्या मुलाचा आज वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले. वाटतेच कांजी हाऊस परिसरात त्यांची हत्या करण्यात आली. सचिन यांचे मारेकरी नेमके कोण होते? त्यांच्या हत्येचे नेमके कारण काय? याचा तपास सुरू आहे.

पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही तपासात आरोपीचा मागोवा घेत आहे. या हत्येमागे तीन ते चार जण असल्याचा पोलिसांना संशय आहे. सचिन यांचा गणेशोत्सवादरम्यान काही लोकांशी वाद झाला होता. सचिन यांच्या हत्येमागे त्यांचा समावेश असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT