Nagpur Latest Marathi News Saam TV
महाराष्ट्र

ATM मध्ये तांत्रिक बिघाड; पाचशेचा विड्रॉल, निघाले अडीच हजार; पैसे काढण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी

रात्री उशिरापर्यंत एटीएम बाहेर पैसे काढणाऱ्यांची तुफान गर्दी जमा झाली.

मंगेश मोहिते

नागपूर : पैशाचा लोभ कुणालाही सुटत नाही असं म्हणतात. आपला खिसा नेहमी गरम राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, पैसा कमविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पण परिश्रम करण्याची तयारी अनेकजण दर्शवत नाही. अशातच कुठूनतरी अचानक आपल्या खिशात पैसा यावा याची वाट अनेकजण बघत असतात. नागपुरातील एका एटीएममध्ये 500 रुपये विड्रॉलसाठी टाकले असता 2500 रुपये विड्रॉल होत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि मग काय नागरिकांनी या एटीएमकडे धाव घेतली. (Nagpur ATM Withdrawal Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा च्या शिवा मार्केटमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. एटीएम मधून पाचशे रुपये विड्रोल टाकले असता त्यातून अडीच हजार रुपये निघत असल्याचा काही नागरिकांच्या लक्षात आलं. ही माहिती बघता बघता आजूबाजूच्या गावात पसरली. मग काय मिळेल ते एटीएम कार्ड घेत अनेकांना या एटीएमकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत एटीएम बाहेर पैसे काढणाऱ्यांची तुफान गर्दी जमा झाली. (Nagpur Latest Marathi News)

दरम्यान, ही बाब लक्षात येताच पोलिसांनी एटीएमच्या दिशेने कूच केली. आणि पैसे काढणाऱ्याला नागरिकांना हुसकावून लावलं. पोलिसांनी एटीएमचा शटर बंद केला आणि पोलीस बंदोबस्त लावला. त्यामुळे पैसे काढायला येणाऱ्या लोकांची मात्र निराशा झाली. विशेष म्हणजे या एटीएमवर पैसे काढल्यानंतर मोबाईलवर बॅंकेतून कोणताही मेसेज संबंधितांना आला नाही.

एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड

दरम्यान, मंगळवारी सकाळी कंपनीची टेक्निकल टीम येथे दाखल झाली. त्यांनी मशीनमध्ये आलेला तांत्रिक बिघाड दूर केला. पैसे काढणाऱ्या एटीएमधारकांचा डाटा काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येईल. याबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती टेक्निकल पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT