Nagpur : अलिशान गाडीत पिस्तूल घेऊन फिरत होता कुख्यात आरोपी! मंगेश मोहिते
महाराष्ट्र

Nagpur : अलिशान गाडीत पिस्तूल घेऊन फिरत होता कुख्यात आरोपी!

तो शहरात नेमक्या कोणत्या उद्धेशने फिरत होता? तो कोणाला संपविण्याच्या तयारीत होता का याचा शोध पोलीस घेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- मंगेश मोहिते

नागपूर : नागपुरातून तडीपार करण्यात आलेला कुख्यात आरोपी शहरात बंदूक आणि पिस्तूल घेऊन आलिशान गाडीतून फिरत असताना गुन्हेशाखा युनिट चार ने त्याला अटक केली असून त्याच्या कडून बंदूक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत.

हे देखील पहा :

नागपूर च्या कळमना परिसरातील कुख्यात चेतन मेश्राम याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं. मात्र, तो शहरात आलिशान गाडीतून फिरत होता. तो नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा चार ला मिळाली. त्यांनी सापळा रचला आणि चेतन मेश्राम आणि त्याचा एक साथीदार यांना अटक केली. त्याच्या गाडीत एक गन, एक पिस्टल  आणि जिवंत कडतूस सुद्धा मिळून आले. त्यामुळे तो शहरात नेमक्या कोणत्या उद्धेशने फिरत होता? तो कोणाला संपविण्याच्या तयारीत होता का याचा शोध पोलीस घेत आहेत.

चेतन मेश्राम वर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं. मात्र, तडीपार असताना सुद्धा तो शहरात गन आणि पिस्टल घेऊन सर्रास फिरत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT