Nagpur : मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या! SaamTvNews
महाराष्ट्र

Nagpur : मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या आरोपींना बेड्या!

मुन्ना अब्दुल अजीज आणि नईम साबीर शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पिस्तूल व शस्त्रे जप्त केली आहेत.

मंगेश मोहिते

नागपूर : मेफेड्रोनची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना नागपूरच्या (Nagpur) पाचपावली पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून पिस्तूल व शस्त्रे जप्त केली आहेत. मुन्ना अब्दुल अजीज आणि शेख नईम शेख साबीर अशी आरोपींची नावे असून अब्दुल हकीम हा नवानकाशा येथील अजहर अली यांच्या घरी भाड्याने राहत होता. मात्र, तो मेफेड्रोन तस्करीत सक्रिय असल्याने त्याचा मित्र शेख नईमच्या घरीच राहायला होता याची माहिती पाचपावलीच्या पोलिसांना (Police) मिळाली होती.

हे देखील पहा :

त्यावरून पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पाळत ठेवून होते. पोलिसांनी सापळा रचून शेख रहीम हा नवा नकाशा भागातील किदवई शाळेजवळ असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ तीस हजारांची जवळपास दहा ग्रॅम मेफेड्रोन (Mephedrone) पावडर सापडली. याशिवाय पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल आणि रोख चौदाशे रुपये सापडले.

पोलिसांनी शेख नईम च्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात देखील शस्त्र (Weapons) सापडून आले आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलिस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT