Nagpur News Saam TV Marathi
महाराष्ट्र

नागपुरात खळबळ! हॉस्पिटलमध्येच डॉक्टर मृतावस्थेत आढळले; मृतदेहाजवळ सापडलेली 'ती' गोष्ट पाहून पोलीसही चक्रावले

Nagpur doctor death : नागपुरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये ४२ वर्षीय डॉक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सापडलेल्या इंजेक्शनमुळे ओव्हरडोज, आत्महत्या किंवा अन्य कारणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

नागपुरातील धंतोली भागात असलेल्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले ४२ वर्षीय वैद्यकीय अधिकारी डॉ. ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार हे त्यांच्याच कक्षात मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला आहे. डॉक्टरांनी आत्महत्या केली की घातपात? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी डॉ. चांदेवार यांनी हॉस्पिटलमधील आपली नियमित कामे पूर्ण केली आणि ते आपल्या कक्षात गेले. मात्र, दीड ते दोन तास झाले तरी ते बाहेर न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांना संशय आला. सहकाऱ्यांनी कक्षात जाऊन पाहिले असता डॉक्टर बेशुद्धावस्थेत पडलेले होते. डॉक्टरांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

इंजेक्शनच्या ओव्हरडोजचा संशय

घटनास्थळी पोलिसांना बधिरीकरणाचे (शून्य करण्याचे) इंजेक्शन सापडले आहे. त्यामुळे डॉक्टरांचा मृत्यू या इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे झाला की त्यांनी आत्महत्या केली, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कौटुंबिक तणावातून टोकाचे पाऊल?

डॉ. चांदेवार हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक आणि कौटुंबिक तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तणावातूनच त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलले का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. डॉ. चांदेवार यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना १५ वर्षांचा एक मुलगा आहे.

सध्या पोलिसांनी डॉक्टरांचा मोबाईल जप्त केला असून, मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी नातेवाईकांची आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.पोस्टमॉर्टमच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: मोदी सरकार बेरोजगारांना २,५०० रुपये देणार? काय आहे केंद्राच्या योजनेचं सत्य?

वयाची तिशी गाठलेल्यांनाही होतोय डायबिटीज; 'ही' 5 लक्षणं दिसताच करा चेकअप

Made in Pakistan Cosmetics: पाकच्या सौंदर्यप्रसाधनांचा राज्यात सुळसुळाट; ‘गोरी ब्युटी क्रीम’चं संगमनेर कनेक्शन

Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

'सर्वच क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच, आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, मुंडे भाऊ-बहिणीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT