MLA Mahesh Shinde criticises shashikant shinde Koregoan Nagar Panchayat Election Results 2022 saam tv
महाराष्ट्र

MLA Mahesh Shinde: शशिकांत शिंदे हे टेस्ट ट्यूब बेबी सारखं नेतृत्व : महेश शिंदे

आता राज्यातील एकेक नगरपंचायतीचे निकाल हाती येऊ लागले आहेत.

ओंकार कदम

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानताे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुक लढवली आणि त्यास यश आले. स्थानिक उमेवादारच हवा हे काेरेगावच्या जनेतनं दाखवून दिले आहे. १० वर्षातील भ्रष्ट कारभारास जनता कंटाळली हाेती. खरतरं शशिकांत शिंदे (shashikant shinde) हे राज्यातील नेतृत्व आहे. त्यांनी राज्यातच थांबावे. टेस्ट ट्यूब बेबी सारखं हे नेतृत्व आहे अशी खाेचक टीका आमदार महेश शिंदे (mahesh shinde) यांनी काेरेगाव येथील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर केली. ते म्हणाले मुंबईतून आलं आणि माेठ्या माेठ्या वल्गना केलं. आता माणसं गंडायला रिकामी नाहीत हे जनतेने दाखवून दिले आहे. (mla mahesh shinde proved once again in koregoan set back to ncp leader shashikant shinde)

कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत (nagar panchayat election result 2022) १७ पैकी १३ जागा आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलने मिळविल्या आहेत. केवळ चार जागा राष्ट्रवादी पॅनेलला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे (ncp) नेते शशिकांत शिंदे यांना हा धक्का मानला जात आहे.

आज राज्यातील एकेक निकाल हाती (Maharashtra Nagar Panchayat Election Results Live Updates) येऊ लागले तसं तसं बहुतांश ठिकाणी शिवेसेनेची आघाडी असल्याचे दिसून आले. राज्यातील जाहीर झालेल्या ५४८ निकालांपैकी १३१ जागांवर सेनेने यश मिळविलं हाेते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanitizer Disadvantage : प्रवासात सॅनिटायझर वारंवार हाताला लावताय? वेळीच व्हा सावध! अन्यथा

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

पाकिस्तान तोंडघशी! पहलगामचे फोटो TRF ने पोस्ट केले, दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली, UNSC च्या रिपोर्टमध्ये दावा

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

SCROLL FOR NEXT