Naame Nirali boat accident Saam TV News
महाराष्ट्र

Palghar Boat Accident : मासेमारी करायला गेले, १६ दिवसांनी परतत होते; समुद्राने चौघांना गिळलं

Palghar Four Sailors Die Boat Accident : समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या गुजरातमधील नामे निराली या बोटीचा मासेमारी करून परतत असताना अपघात झाला आहे.

Prashant Patil

पालघर : गुजरातमधील नामे निराली बोटीचा समुद्रात भीषण अपघात झाला आहे. समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपघातात पालघर मधील चार मच्छीमार खलाशांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. मयत चार खलाशी पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवाशी आहेत. अक्षय वाघात , अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर अनिल वांगड आणि जलाराम वळवी यांना बाहेर काढण्यात गुजरात प्रशासनाला यश आलं आहे.

समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या गुजरातमधील नामे निराली या बोटीचा मासेमारी करून परतत असताना अपघात झाला असून या अपघातात पालघरच्या झाई येथील चार मच्छीमार खलासांचा बुडून मृत्यू झाला आहे. गुजरात मधील नामे निराली ही बोट १८ फेब्रुवारी रोजी १० खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. मात्,र परतत असताना या बोटीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील चार खलासांचा बुडून मृत्यू झाला तर याच भागातील दोन खलाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात गुजरात सरकारला यश आलं.

अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा अशी चार मयत मच्छीमार खलाशांची नावं असून अनिल वांगड आणि जलाराम वळवी या दोन खलाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं आहे. १८ फेब्रुवारी रोजी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेली ही बोट तब्बल १६ दिवसानंतर समुद्रकिनाऱ्यावर परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या अपघातात एकाच परिसरातील तब्बल चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून सध्या हळहळ व्यक्त होत आहे. पालघरच्या ग्रामीण भागातील शेकडो खलाशी हे रोजगारासाठी गुजरातमधील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. या दुर्घटनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश् आता ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT