देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार का
बाळासाहेब फडणवीसांचे मोठे विधान
देवाभाऊ पुस्तक प्रकाशन सोहळा
ऐकलतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काका बाळासाहेब फडणवीसांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित 'देवाभाऊ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाबद्दल आणि भविष्यातील राजकारणाबद्दल अनेक मोठे दावे आणि वक्तव्ये करण्यात आली. त्यातच फडणवीस पंतप्रधान होणार असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांचे काका बाळासाहेब फडणवीसांनी केलं.
तर त्याच कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकात पाटलांनी पुन्हा एकदा सर्वांच्या भुवचा उंचावणारं वक्तव्य केलंय. ते काय म्हणाले आहेत ते पाहूयात. तर मोदींना हटवून मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर आनंदच आहे अशी भूमिका काँग्रेसनं घेतलीय. तर राऊतांनी फडणवीसांना पंतप्रधान होण्यासाठी एक सल्ला दिलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून रंगलीय.. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीची आणि नवीन चेहऱ्याला पंतप्रधानपदासाठी संधी मिळणार असल्याचीही वेळोवेळी चर्चा होत असते. त्यामुळे २०२९ साली भाजपात नेमकं काय होणार याबाबत उत्सुकता ताणली गेलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.