Osmanabad DCC Bank News Updates कैलास चाैधरी -
महाराष्ट्र

Osmanabad DCC Bank: डीसीसी निवडणुकीत भाजपा चारीमुंड्या चीत, महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

या निवडणुकीत भाजपचा अक्षरशः दारूण पराभाव झाला आहे. महाविकास आघाडीने पंधरा पैकी पंधरा जागा जिंकल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चाैधरी -

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Osmanabad DCC Bank) झालेल्या निवडणुकीत भाजपचा (BJP) अक्षरशः दारूण पराभाव झाला आहे. महाविकास आघाडीने पंधरा पैकी पंधरा अशा सर्वच जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील विरुद्ध भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील असा सामना रंगला होता अखेरच्या टप्प्यात चांगलीच चुरस वाढली होती. (Osmanabad DCC Bank News Updates)

यामध्ये महाविकस आघाडीत (MVA) प्रत्येकी 5-5 जागा मिळाल्या असून शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. यात महाविकास आघाडी 5 जागेवर निवडून आले त्यानंतर 10 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती यात आठ मतदान केंद्रावर 808 पैकी 798 मतदान झाले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT