Dhananjay Munde And Pankaja Munde  Saam Tv
महाराष्ट्र

'... अन् त्यांना मी ३२ हजार मताने पाडलं; धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंना नाव न घेता टोला

परभणीच्या गंगाखेड येथे एका सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.

राजेश काटकर

परभणी : सामाजिक न्याय खात्याच्या मंत्री झाल्यावर कुणी माझ्यावर टीका केली.मला आठवत नाही कोणी केली .मात्र मला ३२ व्या नंबरच्या खात्याचं मंत्रीपद मिळालेला आहे , अशी टीका केली. नंतर ज्यांनी कोणी हे सांगितलं त्यांना मी ३२ हजार मताने पाडलं, असा टोला पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) नाव न घेता राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी लगावला. परभणीच्या गंगाखेड येथे एका सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. ( Maharashtra Politics Latest News In Marathi)

हे देखील पाहा -

सध्या राज्यात हनुमान चालीसा पठण करण्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. राणा दांपत्य आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठणावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे आणि राणा दांपत्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, 'राज्यात काहीजण उठलेत आणि आम्हालाच आमचा धर्म शिकवत आहेत, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या आवाहनाचा समाचार घेतला.

दरम्यान,मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली.हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा मंदिरात म्हणले जाते, कुणाच्या घरासमोर म्हणल्यास हनुमानचा प्रकोप लागत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी राणा दांपत्यावर केली .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT