Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरे यांच्या भोंग्या संदर्भातील भूमिकेला सोलापुरातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे समर्थन

सोलापुरातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याच्या मुद्द्याला समर्थन दिले आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पाडवा मेळाव्यामध्ये अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने मशिदीवरील भोंगे काढले नाहीतर त्या भोंग्यासमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या याच मुद्द्यावरुन पुण्यातील मनसेत भूकंप झाला आहे. पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मनसेला राजीनामे दिले आहेत. पण सोलापुरातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याच्या मुद्द्याला समर्थन दिले आहे.

राज ठाकरे यांच्या भोंग्या संदर्भातील भूमिकेला सोलापुरात मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे समर्थन दिले आहे. 'राज ठाकरे यांनी नमाज पठाणाला, अजान देण्यास विरोध केलेला नाही. मशीदवरील भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश दिले आहेत. तीच भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. जे पदाधिकारी राजीनामे देत आहेत त्यांना राज ठाकरे यांची भूमिका समजलेलीच नाही असे दिसते', अशी प्रतिक्रीया सोलापूर मनसेचे शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी म्हटले आहे.

पण पुण्यातील मनसेच्या (MNS) मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजिद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजिद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने ही भूमिका पदाधिकारी घेत आहेत.

यानंतर पुणे मनसे अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी भोंग्याबाबत वेगळी भूमिका घेतली होती. यामुळे राज ठाकरे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. आता वसंत मोरे यांना अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशाने नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यपदी निवड करण्यात आली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT