Aurangabad News Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad News : जादूटोणा केल्याच्या संशयातून हत्या; औरंगाबादमधील धक्कादायक घटना

औरंगाबाद शहरात भाऊबीजेला एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना गडल्या होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडीया -

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात (Aurangabad City) भाऊबीजेला एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यातील मिटमिटा परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना (Police) यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे जादूटोणा करत आपल्या धंद्यामध्ये नुकसान घडवून आणल्याच्या मानसिकतेमधून हा खून झाल्याचे उघडकीस आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत कारभारी शेंबडे हा आरोपी सद्दाम सय्यद सिराज सय्यद याच्या सासरवाडीचा असल्याने दोघांची ओळख होती. आरोपी सय्यद याचे कमळापूर येथे फर्निचरचे दुकान आहे.

मयत शेंबडे याने जादूटोणा करून आणि जडीबुटी वापरून धंद्यामध्ये नुकसान केले असल्याचा राग मनात धरून आरोपी सय्यदने मयत शेंबडे यांना शहरातील मिटमिटा परिसरात माझ्या परिचयातील महिलेला मूलबाळ होत नाही तू काही जडीबुटी दे असे सांगून बोलावून घेतले.

पाहा व्हिडीओ -

मयत शेंबडेसोबत आलेल्या दोघांना माघारी पाठवत मयत शेंबडे आणि आरोपी सय्यद सोबत दारू प्यायले, त्यानंतर एका हार्डवेअर वरून फावड्याचा लाकडी दांडा घेऊन रेल्वे पटरीच्या बाजूला शेंबडे यांच्या डोक्यात मारून त्याचा खून केला अशी कबुली आरोपीने एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

SCROLL FOR NEXT