Latur Crime News in Marathi, Latur latest Marathi News
Latur Crime News in Marathi, Latur latest Marathi News Saamtv
महाराष्ट्र

जेवणाचे पार्सल आणण्यास नकार दिल्याने लातूरमध्ये एकाचा खून!

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणाचा डब्बा पार्सल आणण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत दोघांनी एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करून खून केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाला आहे. तर, दोघेही आरोपी फरार झाले असून औसा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (Latur Crime News in Marathi)

हे देखील पाहा :

औसा तालुक्यातील औसा-तुळजापूर महामार्गावरील पॅराडाईस बार येथे आरोपी सैफ शेख आणि त्याचा मित्र बब्बू शेख हे दारू पित बसले होते. दरम्यान सदर ठिकाणी गाढवेवाडीचा 30 वर्षीय विजयकुमार वसंत राठोड हा तरुण आला होता. त्यास बाहेरून जेवण पार्सल आण म्हणून सांगितले असता विजय राठोड यांने नकार दिला रागाने चिडून जाऊन सैफ शेख आणि त्याच्या मित्रांने चाकूने हल्ला केला.

यात विजय राठोड गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, गंभीर जखमी असल्याने त्यास लातूरला हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान विजय याचा मृत्यू झाला आहे. आरोपी सैफ शेख आणि बब्बू शेख हे दोघेही फरार झाले असून औसा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

SCROLL FOR NEXT