नागपूरात हत्यांचं सत्र सुरुच! प्रेम प्रकरणातून केली तरुणाची हत्या Saam Tv
महाराष्ट्र

नागपूरात हत्यांचं सत्र सुरुच! प्रेम प्रकरणातून केली तरुणाची हत्या

नागपूर मधील कपील नगर पोलिस स्टेशन अंतर्गत म्हाडा कॉलनी येथे प्रेम प्रकरणाच्या वादातून हत्या मुलीच्या भावाने केली युवकाची हत्या

साम टिव्ही ब्युरो

नागपूरच्या कपिल नगर (Nagpur kapil nagar murder case) मधील म्हाडा कॉलनी परिसरात काल रात्री सातच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली. मृतकाचे नाव कमलेश बंडू सहारे असे आहे. तरुणीची छेड काढल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच मृतक कमलेश यांनी म्हाडा कॉलनी परिसरात एका तरुणीची छेड काढली याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून मृतक कमलेशला अटक केली. काही दिवसापूर्वीच जामिनावर बाहेर आला आणि परत काल आपल्या बहिणीकडे गेला असताना तरुणीचे भाऊ उज्वल दीपक व त्याच्या साथीदारांनी मृतक याला रस्त्यात अडवले आणि धार दार शस्त्राने वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले.

मृतक याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपी फरार झालेले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसर्‍या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या अनुशंगाने पुन्हा एकदा नागपूरमधील तरुणाईला पोलिसांचा धाक राहिलाय का असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. कारण मागच्या काही दिवसात नागपूरमध्ये हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यावरुन नागपूर करांच्या मनात भितीचं वातावरण तयार झालं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Benefits: महागडे प्रोडक्ट सोडा; चेहऱ्याला लावा बटाटा

Indapur Politics: इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का, भावाने दिला विरोधी उमेदवाराला पाठिंबा

Singham Again VS Bhool Bhulaiyaa: सिंघम अगेन की भुल भूलैया 3, तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा टॉप १० मधील 'तगडा' चित्रपट कोणता?

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

SCROLL FOR NEXT