उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2026
पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ
हनुमान मंदिर येथील छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय शाळेतील प्रकार
ईव्हीएम मशीनची पेटी एक्टिवा मोटरसायकल वरून घेऊन जाताना उमेदवारांनी घेतला आक्षेप
वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार दिल्याने कोल्हापुरात तरुणींचा संताप
कोरगावकर हायस्कूल मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा तरुणींना बसला फटका
मतदान केंद्रात येऊन ही तरुणींना न मतदान करताच परतावं लागलं
चार वाजल्यापासून रांगेत थांबूनही मतदान करू न दिल्याने तरुणींनी मतदानावर टाकला बहिष्कार
पोलीस आणि मतदार तरुणींमध्ये शाब्दिक चकमक
कोल्हापूर -
वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार दिल्याने कोल्हापुरात तरुणींचा संताप
कोरगावकर हायस्कूल मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा तरुणींना बसला फटका
मतदान केंद्रात येऊन ही तरुणींना न मतदान करताच परतावं लागलं
चार वाजल्यापासून रांगेत थांबूनही मतदान करू न दिल्याने तरुणींनी मतदानावर टाकला बहिष्कार
पोलीस आणि मतदार तरुणींमध्ये शाब्दिक चकमक
वसई -
वसई पूर्वेच्या वसंत नगरीतील सेठ विद्यामंदिर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ
गोंधळानंतर पोलिसांचा भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
माजी आमदार क्षितीज ठाकूर यांना आत का सोडले असा सवाल करून घातला गोंधळ
मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
पनवेल -
- पनवेल महानगरपालिकेच्या मतदानानंतर भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष
- निकाल लागण्याआधीच पनवेलमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष
- पनवेलमधील प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रा बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून विजयाच्या घोषणा
- भारत माताची की जय सोबत एकच वादा प्रशांत दादा च्या पनवेलमध्ये घोषणा
- पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल असा कार्यकर्त्यांना विश्वास
अहिल्यानगर -
अहिल्यानगरमध्ये युतीच्या उमेदवारांकडून निकालाआधीच विजयाचा विश्वास
प्रभाग क्र.13 मधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार अविनाश घुले यांचे विजयाचे बॅनर झळकले
विशेष म्हणजे या बॅनरवर त्यांना महापौर होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या
हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे
धुळे -
धुळे महानगरपालिका निवडणूक मतदान आकडेवारी
सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंतची अंदाजित टक्केवारी
52.24 % मतदान
नांदेड -
नांदेडमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा.
सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला झाली होती सुरुवात.
सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असताना देखील सायंकाळच्या सत्रात मतदारांनी केली मतदानासाठी गर्दी.
नांदेड शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदाराच्या रांगा लागल्याचे चित्र.
रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची शक्यता.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 41.65 टक्के मतदानाची नोंद.
नांदेड महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 81 जागेसाठी एकूण 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
लातूर शहरातल्या अनेक मतदान केंद्रात शेवटच्या टप्प्यात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठी गर्दी केली आहे, वाढती गर्दी लक्षात पाहून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केलाय, मतदान केंद्राचे गेट वेळ होऊन गेल्याने बंद केले आहेत मात्र मतदानासाठी आलेल्या नागरिकांची अनेक मोठ्या रांगा लागल्या आहेत
सोलापुरातील किडवाई चौक परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झालीये. राजकीय पूर्ववैमन्यासातून खलिफा आणि मैंदर्गीकर या दोन गटात वाद झाला आहे. दोन्ही गटातील एक एक व्यक्ती जखमी असल्याची माहिती आहे. या भांडणानंतर पोलीस उपायुक्तसह पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालेत.
पिंप्राळा परिसरातील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराच्या घरी पोलिसांचा मोठा फौजफाटा आल्याने गोंधळ उडालाय. पोलिसांनी दोन तास कुणालाही घराबाहेर पडू न दिल्याचा ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार मयूर कापसे यांच्या कुटुंबाचा आरोप केलाय. सकाळी साडेसात वाजता घरी पोलिसांचा फौज फाटा आला आणि घराबाहेर निघू नका असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याची कुटुंबाची माहिती. कापसे कुटुंबातील सदस्य मयूर कापसे हे वार्ड क्रमांक आठ मधून ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत.
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये बोगस मतदानाचा प्रकार घडलाय. यामध्ये महिलेचं मतदानापूर्वी झालं होतं मतदान. मतदानास आली तेव्हा, तिला तुमच्या नावावर मतदान आधीच झाल्याचं समोर आलंय प्रत्यक्षात महिलेने मतदान केलेच नाही.
लातूर शहर महानगरपालिकेसाठी आज मतदान पार पडत आहे, मतदानासाठी अगदी काही मिनिटे शिल्लक असताना पूर्व भागातील , वार्ड नंबर 8,2,1,4 या प्रभागातील मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. शेवटच्या वेळेत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारांनी तोबा गर्दी केली आहे, अगदी सुरळीत मतदान पार पाडाव याकरिता पोलिसांचा देखील या मतदान केंद्रावर बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याची बाब उघडकीस आली असून, त्यानंतर संबंधित महिलेने बेधडक सवाल केले. यानंतर तिच्याकडून पोस्टल मतदान करून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर घडली आहे. शेख हसीना असे या महिलेचे नाव असून विशेष म्हणजे गेल्या 35 वर्षांपासून ती महिला याच मतदान केंद्रावर करते मतदान..
पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 ड मध्ये राष्ट्रवादीचे बटन दाबल्यानंतर मतदान होत नसल्याचा आरोप केला जातोय. उमेदवाराने आक्षेपाने मतदान केंद्रावर गोंधळ केल्यावर 360 मतदान राखीव ठेवल्याचा अधिकार्याचा निर्णय
नवी मुंबईतील तुर्भे परिसरात मतदानादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तुर्भे येथील मतदान केंद्रांवर मतदारांची प्रचंड गर्दी झाली असून, वारंवार बिघडणाऱ्या मतदान यंत्रांमुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
जालन्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप होतोय.एका संशयिताला पोलिसांनी पकडल्यानंतर इतर संशयित आरोपी फरार झाल्याचा दावा होतोय.अपक्ष उपेदवाराचे प्रतिनिधी शंकर घोडके यांनी भाजपच्या उमेदवार संध्या देठे यांच्यावर आरोप केला असून , आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधीने काही व्हिडिओ आणि बोगस मतदारांचे मतदान कार्ड दाखवले आहे.भाजप उमेदवार संध्या देठे यांनी बोगस मतदार आणल्याचां आरोप त्यांनी केलाय.दरम्यान भाजप उमेदवार संध्या देठे यांनी हे आरोप फेटाळले असून विरोधकांची हार दिसत असल्यामुळे ते आरोप करत आहेत तसेच त्यात शिवसेनेचा देखील हात असल्याचा आरोप संध्या देठे यांनी केलाय.
कांदिवली येथील एका मतदान केंद्रावर नेमलेले निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी भाजपच्या अॅपचा वापर करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व तटस्थ असणे अपेक्षित असताना, एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या अॅपचा वापर होत असल्याने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या दिवशी भाजपकडून अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून टी-शर्टच्या माध्यमातून मतदारांनी कोणते बटन दाबावे, याचा संकेत देत प्रचार सुरू असल्याचा आरोप उमेदवार महिला व पुरुषांनी केला. या आरोपांनंतर संबंधित परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
गोळीबारच्या घटनेवर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पिंपराळा भागातील रहिवासी असलेले सचिन आणि मुस्तफा नामक तरुणांमध्ये आर्थिक विषयावरून वाद होता. त्यातून गोळीबारची घटना घडलेली आहे. या घटनेचा मतदानाशी काहीही संबंध नाही. दरम्यान जनतेने निर्भीडपणे मतदान करावे, असे आव्हान देखील पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदारांचा सुळसुळाट...
प्रभाग क्रमांक तीन मध्ये आनंदनगर शाळेत शिवसेना शिंदे सेनेच्या उमेदवारांनी पकडले 50 बोगस मतदान कार्ड....
मतदान प्रक्रिया दबाव खाली सुरू असल्याचा शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांचा आरोप...
या ठिकाणची मतदान बंद करा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी...
मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ...
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारित होत आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी ही बाब मान्य केल्याचेही या वृत्तात सांगितले जात आहे.
याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे, माध्यमांत प्रसारित होणाऱ्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.
एकच घरातील मतदारांचे तीन ते चार ठिकाणी मतदान आले असल्याने कोणी कुठे मतदान करावे असा संभ्रम तयार झाल्याचे समोर आलेय.
विरार पूर्व मनवेलपाडा भागातील नाव फुलपाड्यात, नालासोपर्यत आली आहेत. मुलीचे एकीकडे, आई दुसरी कडे तर वडिलांचे तिसरीकडेच नाव मतदान केंद्रावर आले आहेत.
अनेक ठिकाणी मशीन मध्ये निशाणी चे बटण दबत नसल्याचा ही आरोप करण्यात आला आहे
महेश राठोड या मतदाराच्या नावावर कोणीतरी अगोदरच मतदान केलं. एक तासानंतर बॅलेट पेपरवर करून घेतलं मतदान
विक्रोळीतील टागोर नगर येथील प्रभाग क्रमांक ११९ मधील सिद्धीविनायगर शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजेश शुक्ला हे दुपारी १२ वाजता मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावावर सकाळीच मतदान झाल्याचे उघडकीस आले. ही बाब त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना बॅलेट द्वारे मतदान करण्याची मुभा उपलब्ध करण्यात आली.
रामनगर येथील प्रभाग क्रमांक २५ मधील मतदान केंद्राबाहेर आज सकाळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बापू घडामोडे,हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांचे पती आहेत त्यांनी मतदान केंद्राबाहेर उपस्थित पोलिसांशी वाद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदान प्रक्रियेदरम्यान काही कारणावरून उमेदवार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. काही वेळ तणाव असला तरी नंतर परिस्थिती शांत झाली आणि मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे
माजी महापौर अपर्णा डोके यांना बहुमताने विजयी करा. अशी फेसबुक पोस्ट करत EVM च चिन्हा समोरली बटन दाबताना मोबाईलमध्ये फोटो काढण्यात आलाय. तो वायरल करण्यात आला आहे. निलेश डोके हे उमेदवार अपर्णा डोके यांचे पती आहेत. याबाबत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी निलेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
- उमेदवार नितीन खोले पैसे वाटप करत असल्याचा शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप
- नाशिक मध्ये शिंदे यांची शिवसेना आणि भाजप पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडले
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मिरच्या मारुती शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनची तोडफोड....
शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित घटनास्थळी दाखल....
आमदार मंजुळा गावित यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी....
दादागिरी करून दहशत माजवली जात असल्याचा आरोप...
तयाअनुषंगानेवरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल....
गेल्या अर्धा तासापासून खोली क्रमांक एक मधील मतदान प्रक्रिया बंद...
भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा शिंदे सेनेच्या नेत्यांचा आरोप
मतदान केंद्राबाहेर छावणीच स्वरूप
जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ होऊन देखील मतदान प्रक्रिया खोळंबली मतदार केंद्राबाहेरच ताटकळत उभे...
जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मधील मतदार केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
अन्य उमेदवार मतदान केंद्रा बाहेर उभे राहून प्रचार करत असल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार शीतल पाटील यांचा आरोप
पोलिसांसमोर हा प्रकार सुरू असतानाही पोलीस पात्र बघायची भूमिका घेत असल्याचाही हेतल पाटील यांनी केला आरोप
सदर प्रकाराबाबत उमेदवार हेतल पाटील यांनी पोलिसांना जाब विचारल्याने शाब्दिक बाचाबाची
पुण्यात सकाळी ७.३० ते ११.३० पर्यंत १४.९२ टक्के मतदान
५ लाख २९ हजार ९९३ जणांनी बजावला मतदानाचा हक्क
प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी मध्ये सर्वाधिक १८.९२ टक्के मतदान
दिग्दर्शक, संगीतकार अजय पूरकर यांनी केले मतदान
अभिनेत्री संस्कृती बालगुडे ने बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता रमेश परदेशी उर्फ पिट्या भाई ने पुण्यात बजावला मतदानाचा हक्क
अभिनेत्री स्मिता गोंदकर ने केलं मतदान
गायिका आर्या आंबेकर ने नोंदवलं पुण्यात मत
अश्विनी दरेकर फिल्म सेन्सर बोर्ड मेंबर यांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावरती राडा....
मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रातील मतदान यंत्राची तोडफोड...
खोली क्रमांक एक मधील मतदान यंत्राची तोडफोड...
भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये शिवीगाळ करत मतदान यंत्रांची तोडफोड केल्याचा आरोप....
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांचा आरोप....
अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये 11:30 वाजेपर्यंत 17.1% मतदान झाले आहे
ठाण्यातील किसन नगर येथील मतदान केंद्रात.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे हे मतदानासाठी आले आहेत.
नाशिकच्या प्रभाग १७ मध्ये भाजप उमेदवार दिनकर आढाव यांच्या गाडीत सापडले पैसे
मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा विरोधकांचा आरोप
गाडीसह दोन लाखांची रक्कम पोलिसांनी घेतली ताब्यात
नाशिक पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते याकडं लक्ष
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 14.31 टक्के मतदान
11.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक2025-26
सकाळी 11. 30 पर्यंत मतदान.
पुरुष मतदान = 33257
स्त्री मतदान = 25441
एकूण मतदान = 58698
टक्केवारी = 13.39%
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार रवी राणा व भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी शंकर नगर परिसरात प्राथमिक शाळेत बजावला मतदानाचा हक्क.....
यावेळी आमदार रवी राणा हे सायकल ने मतदान केंद्रावर पोहचले होते
यावेळी तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला अशा प्रकारचा खोचक टोला माजी खासदार नवनीत राणा यांनी लगावला
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 59 मध्ये अभिनेते प्रशांत दामले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
आज पर्यंत अनेक निवडणुका झाल्या मात्र महानगरपालिकेची अशी निवडणूक कधीही बघितली नाही भाजप कडून एका मताला पाच ते दहा हजार रुपये वाटप केले जात असल्याचा आरोप परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केला आहे भाजपकडून या निवडणुकीत पैशांचा मारा केला जात आहे कारण त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही विकास नाही आम्हाला म्हणतात आमची सत्ता नाही मनपा मध्ये येऊन तुम्ही काय करणार तुम्ही चार वर्षे प्रशासकाच्या काळामध्ये काय विकास केला असा सवालही खासदार संजय जाधव यांनी विचारलाय परभणीतच नाही तर मुंबईमध्येही शिवसेनेचा आज महापौर होईल असं संजय जाधव म्हणाले आहेत
युवा स्वाभीमान पक्षाचे आमदार रवी राणा सायकल चालवत मतदान केंद्रावर मतदानासाठी रवाना
तत्पूर्वी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी एकमेकाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या
शहरात वाढते प्रदूषण लक्षात घेता मी सायकलने मतदान करायला जात असल्याच आमदार रवी राणा यांनी सांगितलं
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मी प्रयत्न करेल असेही आमदार रवी राणा यांनी सांगितले
उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह त्यांनी मतदान केले आहे. सर्वांना मतदान करण्याचे आवाहदेखील उद्धव ठाकरेंनी केले आहे.
पुणे शहरात सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत अवघे ६ टक्के मतदान
२ लाख २६ हजार २१९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पुण्यात तब्बल ४ हजार मतदान केंद्र
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस सतर्क...
16 प्रभागातील मतदान केंद्रांवर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर..
मतदानाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडनं खबरदारी....
जालना शहरातील 291 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे...
सांगलीच्या मिरजेमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे.शहरातल्या प्रभात पाच मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडले होते.सुमारे 1 तास या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती.शहरातील जवाहरचौक येथील 26 नंबर मतदान केंद्रावर
तीन मतदान झाल्यानंतर चौथे मतदान करताना मशीन बंद पडल्यानंतर या ठिकाणी मोठ्या गोंधळ निर्माण झाला,त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली,अखेर अर्ध्या तासानंतर या ठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन लावण्यात आले, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली आहे.मात्र मतदानातचा 1 तासाहून अधिकचा वेळ वाया गेल्याने मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी आता उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
संभाजीनगर मध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ उडाला आहे संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात मतदान यंत्रावरील बटन काम करत नसल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे तर मतदारांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा लागल्या आहेत आम्ही किती वेळ रांगेत उभे राहायचे असा प्रश्न मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केला आहे प्रभाग क्रमांक 9 मधील मतदान केंद्र क्रमांक 15 मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे दरम्यान एमआयएम चे उमेदवार काकासाहेब काकडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान केंद्रात जाऊन जा विचारला आहे दरम्यान या संदर्भात आढावा घेत मतदारांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी
अकोल्यातल्या एका मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद.. वादांचं रूपांतर किरकोळ हाणामारीमध्ये झालंये. अकोला महापालिकेतील प्रभाग 17 मधील भांडपुरा चौकातल्या महापालिकेच्या उर्दू कन्या शाळेच्या मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे. या मतदान केंद्रावर लोकांची मोठी गर्दी.. दरम्यान, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने अर्थातच पोलिसांच्या हस्तक्षेपांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.. दरम्यान पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर जमलेली गर्दी पांगवली.. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे.. मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढला आहे...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार 67 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्य इमारतीमध्ये वेब कास्टिंग सुविधा उभारण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत महापालिकेच्या वतीने सर्व मतदान केंद्रांवर मिळून चार हजार 528 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या सर्व मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये वॉर रुम उभारण्यात आली आहे.
राज ठाकरे कुटुंबासह मतदानासाठी दाखल झाले आहेत. आई, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि सुनबाई मिताली यांच्यासह मतदान करणार आहेत.
अकोला महापालिकामध्ये सकाळी 9:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 6.48 टक्के
मतदान करून या आणि हॉटेलमध्ये जेवणावर दहा टक्के मिळवा
नाशिकमधील काही हॉटेल्स चालकांकडून ऑफर्स
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हॉटेल चालक देखील प्रयत्न करत असल्याचा बघायला मिळत आहे.
नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदान यंत्रात बिघाड
महापालिकाच्या शाळेतील मतदान केंद्रातील EVM मध्ये बिघाड
मतदान यंत्रात बिघाड झाल्यान मतदान प्रक्रिया रखडली
इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मध्ये एका हॉलमध्ये भाजप उमेदवार मतदारांना पैसे वाटप करत होता. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पैसे वाटपाबद्दल जाब विचारला असता एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. काही काळ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी एका हॉलमधून शेकडो मतदारांना ठेवण्यात आले होते. या नागरिकांनाच पैसे दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
अकोल्यातल्या प्रभाग 3 मध्ये श्रीराम नगर भागातील 25 ते 30 लोकांचे मतदार यादीतून नाव गायब.. श्रीराम नगरातील अशी टक्के एरिया लोकांचे नाव मतदार यादीत नाही आहे.. त्यामुळे मतदारांमध्ये रोष आहे.. हातात मतदान कार्ड आहे.. मात्र मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदान करता येणार नाही... विधानसभा लोकसभेचे मतदान केलं, मात्र महापालिकेच्या मतदानांपासून इथल्या नागरिकांना आता दूर राहावे लागणार आहे...
नाशिकमध्ये सकाळी ७.३० ते ९.३० या २ तासांत ६.५१ टक्के मतदान
EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड...
नाशिकच्या प्रभाग 16 मधील बूथ क्रमांक 13 मध्ये EVM मशीन बंद...
मतदान प्रक्रिया खोळंबली...
सकाळपासून अनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे मतदारांना मनस्ताप...
धनुष्यबानासमोरील बटण दाबले जात नसल्याने उमेदवार संतप्त...
निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयास्पद...
तात्काळ सुधारणा झाली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ...
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल दिवे यांचा निवडणूक आयोगाला इशारा...
EVM मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू...
डोंबिवली दत्तनगर येथे हास्य जत्रा फेम कलाकार ईशा डे यांनी बजावला मतदानाचा हक्क
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे1 पणतू आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सांगलीतल्या प्रभाग क्रमांक 11 मधून ते काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.हर्षवर्धन पाटील यांनी वसंतदादा कारखान्याच्या कामगार भवन येथील
महापालिकेच्या शाळा क्रमांक 14 मध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग 11 मध्ये हर्षवर्धन पाटील यांची भाजपा उमेदवार मनोज सरगर यांच्या बरोबर लढत आहे. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे.
सचिन तेंडुलकर यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकांना मतदान करण्यास सांगितले आहे.
भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
प्रभाग क्रमांक ८ मधील मराठा हायस्कुलमधील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क
कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला
पुण्यातील नु. म वी शाळेत बजावला मतदानाचा हक्क
अर्जुन खोतकर यांची मुलगी पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात...
दर्शना खोतकर प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणुकीच्या रिंगणात,
मतदानापूर्वी सीमा खोतकर यांच्याकडून उमेदवार दर्शना खोतकर आणि आमदार अर्जुन खोतकर यांच औक्षण....
जालन्यात शिवसेनेचाच महापौर होईल अर्जुन खोतकर यांचा दावा....
चंद्रपुरातील महाकाली प्रभाग क्रमांक 12 मध्ये मतदान सुरू असताना सन्मित्र कॉन्व्हेंट केंद्रात एक ईव्हीएम बंद पडले. अर्ध्या तासापासून ईव्हीएममध्ये बिघाड आहे. बूथ क्रमांक 10 येथील खोली क्रमांक तीनमधील मशीन बंद पडले आहे. वेळ वाया गेल्याने काँग्रेस उमेदवार आणि माजी महापौर संगीता अमृतकर यांनी मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली.
पनवेलमध्ये मतदानादरम्यान गंभीर प्रकार समोर आल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील बालाजी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदारांच्या बोटाला कायमस्वरूपी शाई न लावता स्केचपेनने खूण केली जात असल्याचा आरोप मनसे उमेदवाराने केला आहे. त्यामुळे दुबार आणि बोगस मतदान सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय महाराष्ट्र शाळेतील मतदान केंद्रावरही अशाच प्रकारचे बोगस मतदान पकडल्याचा दावा मनसेने केला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेवर बहुमत आमचंच होणार
सध्या भाजपमध्ये नवीन भाजप आणि जुनी भाजप असा वाद सुरू आहे
जुनी भाजप सतरंज्या उचलत आहे तर नवीन भाजप खुर्चीत बसलेला आहे
मतदार यादींचा जो घोळ आहे याचा फटका सर्वसामान्यांसोबत मंत्री आणि आमदारांना सुद्धा बसलेला आहे
दोषयुक्त मतदार याद्यांचा फटका मतदारांना बसला
मतदारांना धमकवणे, पैसे वाटणे दहशत निर्माण करण्यापलीकडे महायुतीकडे सध्या काहीच नाही
तेजस्वी घोसाळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दहिसर दौलत नगर येथील डी एम हायस्कूल मध्ये जाऊन तेजस्वि घोसाळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी बजावला मतदानाचा हक्क
वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथील शेठ विद्या मंदिर शाळेतील मतदान केंद्रात केलं मतदान
मतदान हा भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकार आहे आणि तो सर्व नागरिकांनी बजावावा आणि जास्तीत जास्त मतदान करावं आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार स्नेहा दुबे यांनी केले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही.. एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त व निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी.
धुळे महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेले आहे, या प्रभाग क्रमांक 16 मध्ये शाळा क्रमांक 29 मध्ये भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी मतदान केले आहे,
यावेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी आणि दोन्ही मुलं सोबत होते, जनता विकासाला कौल देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला, विकास पर्वाला जनता साथ देईल असं सांगत जनतेने जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन केले. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना आणि अन्य पक्षांचा सामना आहे, भाजपाचे 74 पैकी चार नगरसेवक हे आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत, या ठिकाणी चुरशीच्या निवडणुकीमध्ये मतदार कोणाला कौल देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ
भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण
दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअप मध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडले
प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळा मधील मतदान केंद्रावर संपूर्ण गोंधळ
पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आज सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला. पनवेल तालुक्यातील नावडे गावातील मराठी शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी शांततेत मतदान केले.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
पुण्यातील गुरुवार पेठेत प्रभाग क्रमांक 26 मध्ये व्होटिंग मशीन बंद असल्याने नागरिक संतप्त
मतदानाला सुरुवात होऊन एक तास झाला तरी मतदान या केंद्रावर सुरू नाही
मतदारांची गर्दी मात्र मशीन सुरू नसल्याने या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतोय
माजी खासदार प्रकाश जावडेकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
पुण्यातील कोथरूड परिसरात प्रकाश जावडेकर यांनी केलं मतदान
जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली. यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला. दरम्यान, मशीनचा क्रम तसेच पोलिंग एजंटला बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याबाबतही उमेदवार प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. उमेदवार प्रतिनिधींची मागणी केल्यानंतर वातावरण शांत झाले
लातूर शहर महानगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे , एकूण 375 मतदान केंद्र शहरात उभारण्यात आलेत, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनाने आणि भयमुक्त वातावरणात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 1 हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत, तर 3 लाख 21 हजार एवढे मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत,
पुण्यातील प्रभाग 24 मध्ये मशीन बंद पडल्याने मतदार संतापले
मतदान केंद्र क्रमांक तीन मधील खोली बंद पडल्याने काँग्रेसचे उमेदवार शर्मा राहुल संतापले
टाईम वाढवून द्यावा अशी काँग्रेसच्या उमेदवारांची मागणी
ईव्हीएम मशीन जेव्हा सुरू होईल तेव्हा वेळ वाढवून देण्याची मागणी
संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातल्या महाराणा प्रताप शाळेतील बुथवर मशीन मध्ये बिघाड
घरातील दुसऱ्या केंद्रावरील मशीन मधली बिघाड
धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड...
मतदान प्रक्रिया खोलबळी...
4,5,10,11 या प्रभागांमध्ये मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड....
तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मशीन बंद...
सुमारे वीस मिनिटात मशीन बंद..
प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न ..
सोलापुरातील ITI महाविद्यालय मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया अद्याप सुरूच नाही
EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील अर्धातपासून मतदान नाही
अद्याप या केंद्रावर एक ही मतदान झालेले नाही
निवडणुक कर्मचाऱ्याकडून मशीन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरु
मात्र सकाळी मतदाणासाठी आलेले नागरिक ताटकळत
मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड
प्रभाग क्रमांक २४ मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक ८ मध्ये मतदानाला अद्याप सुरुवात नाही
EVM मध्ये बिघाड झाल्यानं अद्याप मतदानाला सुरुवात नाही
भाजप नेते सुधाकर बडगुजर आणि बडगुजर कुटुंबाने केले मतदान...
नाशिक मधल्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या लढतील मध्ये सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजर यांची लढत...
सुधाकर बडगुजर हे प्रभाग २५ मधून तर दीपक बडगुजर प्रभाग 29 मधून निवडणुकीच्या रिंगणात
बडगुजर कुटुंबाकडून सकाळी देवदर्शन करत मतदान केंद्रावर येऊन केले मतदान...
निवडणुकीच्या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले मात्र जनता आमच्या सोबत आहे विजयाचा विश्वास असल्याचा दावा बडगुजर कुटुंबांनी केला दावा...
जालना महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात , कडाक्याच्या थंडीतही नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल...
65 जागांसाठी तब्बल 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
291 मतदान केंद्रावर 2 लाख 45 हजार 929 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार
रावसाहेब दानवे ,अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांची प्रतिष्ठा पणाला...
मनपा निवडणुकीसाठी जवळपास 1200 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी तैनात असणार आहे तर जवळपास 1300 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी कार्यरत आहेत...
आज 454 उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये काही होणार आहे...
पुण्यात मतदानाला सुरुवात
पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची सकाळीच लाईन
सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात
संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान करता येणार
पुण्यात ४००० मतदान केंद्र तर ३५ लाख मतदार
पुणे महानगरपालिकेसाठी तब्बल ९ वर्षांनंतर होणार निवडणुका
धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात
एकूण जागा 74, बिनविरोध 4
70 जागेंसाठी 316 उमेदवार रिंगणात...
शहरात एकूण 507 केंद्र...
संवेदनशील केंद्र 13
एकूण चार लाख तीस हजार 387 मतदार आज आपल्या मतदानाचा बजावणार हक्क
कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने अधिकाऱ्यांसह पंधराशे पोलीस बंदोबस्त
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले
रवींद्र धंगेकर यांचे पत्नी आणि मुलगा निवडणूक रिंगणात
पत्नी प्रतिभा धंगेकर प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणूक रिंगणात तर मुलगा प्रणव धंगेकर प्रभाग क्रमांक २४ मधून निवडणूक रिंगणात..
भाजपचे पुणे शहर निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या विरोधात प्रणव धंगेकर रवींद्र धंगेकर याचा मुलगा निवडणूक रिंगणात आहे.
धंगेकर विरुद्ध बिडकर अशी लढत
भाजपचे उमेदवार भुषण शिंगणे यांच्यावर रात्री हल्ला
रात्री 12 वाजता दरम्यान गोरेवाडा परिसरात कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती..
प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून हल्ला केल्याची माहिती
भुषण शिंगणे नागपूर भाजपचे प्रभाग ११ चे उमेदवार
नागपूरातील मेयो रुग्णालयात भुषण शिंगणे यांच्यावर उपचार सुरु
-गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी गुरुवारी मतदान
सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया
शहरात एकूण १५६३ मतदान केंद्रांवर मतदारांचा कौल
२६६ मतदान केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील; विशेष पोलीस बंदोबस्त
१३ लाख ६० हजार ७२२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार
मतदारांमध्ये ६ लाख ५६ हजार ६७५ महिला मतदार
७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश
७९ तृतीयपंथीय मतदार देखील मतदान करणार
मतदानासाठी ४८६० बॅलेट युनिट्स आणि १८०० कंट्रोल युनिट्स सज्ज
३१ प्रभागांत १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार रिंगणात
यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे उमेदवार
२०८ अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात
ठाणे महानगर पालिकेतील 131 नगरसेवक पदाच्या मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.33 प्रभागात सदरची निवडणूक पॅनल पद्धतीने होत आहे. 2013 मतदान केंद्र आहेत.12.650 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 11 विभागांमध्ये 44 ठिकाणी 305 संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाण आहेत त्या ठिकाणी 701 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळित पार पडावी या साठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
अपक्ष उमेदवार तेजल दीपक पवार यांची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार
मतदारांना फोन व प्रत्यक्ष भेटीद्वारे धमकावल्याचे तक्रार अर्जात आरोप
मतदानाच्या दिवशी वाहनांचा वापर करून दबाव टाकण्याची शक्यता व्यक्त
काही अज्ञात व्यक्ती परिसरात फिरत असल्याची तक्रारीत नमूद
मतदारांच्या स्वातंत्र्यपूर्ण मतदानाच्या हक्कावर गदा असल्याचा पवार यांचा दावा
संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची मागणी
मतदानाच्या दिवशी चौकाचौकात पोलिस तैनात करण्याची विनंती
तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी
मतदान करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार
त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार शहर निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती
खाली दिलेल्या १२ ओळखपत्रे धरले जाणार ग्राह्य
पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅनकार्ड, आधारकार्ड, सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला
राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट ऑफिस खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, मनरेगाअंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाचे दस्तऐवज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
केंद्र अथवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
पुणे महानगरपालिकेत १६३ जागांसाठी आज मतदान होत आहे. शहरातील ४ हजार ०११ मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहे.पुण्यात एकूण ४१ प्रभाग असून १६५ जागा आहेत.चार सदस्य प्रभाग ४० असून पाच सदस्य प्रभाग एक आहे.एकूण १हजार १५५ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्याने आज प्रत्यक्षात १६३ जागांसाठी होणार मतदान होणार आहे.पुण्यात होणार चौरंगी लढत होत आहे.महायुती मध्ये असणारे तिन्ही पक्ष समोरासमोर आहेत.शहरात एकूण ३५ लाख ५२ हजार ६३७ मतदार आहे.यामध्ये पुरुष मतदार १८ लाख ३२ हजार ७८९ तर महिला मतदार १७ लाख १३ हजार ३६० आणि इतर ४८८ मतदार आहेत. दुबार मतदार याच्याबाबतही आयोगाकडून काळजी घेतली जाते. मॉक पोल अगोदर घेतला जाईल आणि सकाळी साडे सात वाजता प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होईल
निवडणूक शांततापूर्ण, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १४ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
पोलिसांसह तीन हजार २५० होमगार्ड॒सची नेमणूक
पुणे शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहाय्यक पोलिस आयुक्त, ७ परिविक्षाधीन सहाय्यक आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहाय्यक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, सुमारे १२ हजार ५०० पोलिस अंमलदार
तीन हजार २५० होमगार्ड तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या चार कंपन्यांचा बंदोबस्त तैनात
पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक येणार निवडून
पुण्यात होणार चौरंगी लढत! महायुती मध्ये असणारे तिन्ही पक्ष लढणार वेगळे
भाजपला दोन्ही राष्ट्रवादी चे आव्हान तर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात
एकूण निवडणूक लढवणारे उमेदवार: 1153
पुणे शहरातील एकूण मतदार: 35 लाख 52 हजार 637
पुरुष मतदार: 18 लाख 32 हजार 789
महिला मतदार: 17 लाख 13 हजार 360
शहरातील एकूण मतदार केंद्र: 4011
इतर मतदार: 488
बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या: 2
मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. शुक्रवारी सकाळपासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत २ हजार ८६९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. महापालिकेसाठी कुठे भाजप-शिंदेसेना तर कुठे भाजप-राष्ट्रवादी यांच्यामध्ये युती आहे. तर ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.