Maratha Reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: बीडमध्ये मराठा आंदोलन पेटलं; आमदारांच्या बंगल्यानंतर नगरपालिकेला लावली आग, VIDEO व्हायरल

Municipal Building Set On Fire by Protester: मराठा आंदोलकांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेच्या इमारतीलाच आग लावली आहे.

Ruchika Jadhav

विनोद झिरे

Maratha Aarakshan:

मराठा आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे. माजलगावात या आंदोलनाला मोठं हिंसक वळण लागलंय. आमदारांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर आता आंदोलकांचा मोर्चा माजलगाव नगरपालिकेकडे वळलाय. मराठा आंदोलकांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेच्या इमारतीलाच आग लावली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बीडच्या माजलगावमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्या गाड्या जाळल्यानंतर त्यांच्या बंगल्यालाही आग लागली. आग इतकी भीषण होती की, आगीने चहूबाजूंनी बंगल्याला वेढा घातला होता. यावेळी त्यांनी सोळुंके यांच्या बंगल्यात जाऊन देखील काचांची तोडफोड केली आहे.

इमारतीच्या आतमधून धुराचे लोंढे बाहेर पडतायत. नगरपालिका परिसरामध्ये आंदोलन आणि बघ्यांची मोठी गर्दी जमलीये. इमारतीला आग लावल्यावर उपस्थितांमध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. सर्वजण इमारतीतून आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागले.

आंदोलक तहसील कार्यालयात पोहचला अन् एकच गोंधळ उडाला

मराठा आंदोलन ठिकठिकाणी पेटलंय. बीड पाठोपाठ हिंगोलीतही मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. हिंगोलीच्या वसमत शहरांमध्ये मराठा आंदोलकाने धावत जात तहसील कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन व आमरण उपोषण सुरू आहे. राज्य सरकार या उपोषणाची दखल घेत नसल्याने आंदोलन करणाऱ्या एका तरुणाने हातात दोरी घेत वसमत तहसील कार्यालय गाठत गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलीस आणि इतर सहकाऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT