Indian Currency Saam tv
महाराष्ट्र

२०० रुपयांच्‍या नोटा छपाईला येतो पाचशे रूपयांपेक्षा जास्‍त खर्च

२०० रुपयांच्‍या नोट छपाईला येतो पाचशे रूपयांपेक्षा जास्‍त खर्च; कोणती नोट छापण्यासाठी किती खर्च येतो वाचा..

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे ज्याप्रमाणे पैशांचा खर्च वाढत आहे. त्याचप्रमाणे आरबीआयही नोटांच्या छपाईवर जास्त खर्च होत आहे. माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) मागवलेल्या माहितीत रिझर्व्ह बँकेने (RBI) सांगितले की २०० रुपयांच्या नोटांच्या छपाईवर सर्वाधिक खर्च येत आहे. (note Printing costs information sought under the RTI Act the RBI)

आरटीआयच्या (RTI) हवाल्याने बिझनेसलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार २०० रुपयांची नोट छापणे ५०० रुपयांपेक्षा महाग असल्याचे दिसते. आरटीआयच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, की १० रुपयांच्या नोटा छापण्यासाठी २० रुपयांच्या नोटेपेक्षा जास्त खर्च येतो. कागदाव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या वाढत्या महागाईमुळे नोटांची छपाई खर्चही सातत्याने वाढत आहे.

कोणती नोट छापायला किती खर्च येतो?

आरबीआयच्या म्हणण्यानुसार सध्या १० रुपयांच्या एक हजाराच्या नोटा छापण्यासाठी ९६० रुपये खर्च येतो. तर त्याची किंमत २० रुपयांसाठी केवळ ९५० रुपये आहे. म्हणजेच १० नोटांच्या छपाईसाठी २० पेक्षा जास्त खर्च येतो. त्याचप्रमाणे ५०० रुपयांच्या हजार नोटा छापण्यासाठी २ हजार २९० रुपये खर्च करावे लागतात. तर २०० च्‍या हजार नोटा छापण्यासाठी एकूण २ हजार ३७० रुपये खर्च येतो. सध्या २००० रुपयांच्या नोटा वगळल्या तर सर्वात जास्त खर्च २०० रुपयांच्या नोटांवर होत आहे. १०० रुपयांच्या १००० नोटा छापण्यासाठी १,७७० रुपये खर्च करावे लागतील.

५० रुपयांच्या नोट छपाईला सर्वाधिक खर्च

एका वर्षात नोटांच्या छपाईच्या खर्चात वाढ झाल्याबद्दल बोलायचे झाले तर त्याचा सर्वाधिक खर्च हा ५० रुपयांच्या नोटांच्या छपाईवर झाला आहे. आरबीआयने सांगितले की २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांच्या नोटा छापण्यासाठी ९२० रुपये खर्च आला होता. जो २०२१-२२ मध्ये होता. तो २३ टक्क्यांनी वाढून १,१३० रुपये झाला आहे. सर्वात कमी परिणाम २० रुपयांच्या नोटांच्या छपाईवर झाला आहे. २०२०-२१ मध्ये जिथे २० हजार रुपयांच्या नोटा छापण्यासाठी ९४० रुपये खर्च झाले होते. तिथे गेल्या आर्थिक वर्षात ९५० रुपये खर्च करण्यात आले आहेत. या काळात ५०० रुपयांच्या नोटांच्या छपाईच्या खर्चात कोणताही बदल झालेला नाही.

चार ठिकाणी होतात नोटा छपाई

रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार मिळून देशात चार ठिकाणी नोटा छापतात. यापैकी दोन प्रेस आरबीआयकडे आहेत. तर दोन केंद्र सरकार चालवतात. आरबीआयची दोन्ही प्रेस म्हैसूर आणि सालबोनी येथे आहेत. तर केंद्र सरकारची प्रेस (Nashik) नाशिक आणि देवास येथे आहेत. मात्र, टांकसाळ नाण्यांचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. देशात मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा येथे नाणी तयार केली जातात.बोलायचे झाले; तर सर्वाधिक खर्च हा ५० रुपयांच्या नोटांच्या छपाईवर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT