Mahavikas Aaghadi Protest Latest Update: Saam Tv
महाराष्ट्र

MVA Protest Mumbai: राजकोट पुतळा दुर्घटनेवरुन जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने, राज्यभरात आंदोलन!

Mahavikas Aaghadi Protest Latest Update: महाविकास आघाडीच्या आजच्या "जोडे मारा"आंदोलनला अद्यापही परवानगी मिळाली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलीस परवानगीची प्रतीक्षा आहे, मात्र परवानगी जरी मिळाली नाही तरी आंदोलन केले जाणार आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे| मुंबई, ता. १ सप्टेंबर २०२४

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. आज राजकोट किल्ल्यावरील या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून जोडो मारो आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला जाणार आहे. दुसरीकडे मविआच्या या आंदोलनाला भाजपही आंदोलनाने उत्तर देणार आहे, त्यामुळे आज राज्यात पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळणार आहे.

मविआचे आज जोडो मारो आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा कोसळल्याचा निषेध म्हणून राज्य सरकारच्या विरोधात आज महाविकास आघाडी जोडो मारो आंदोलन करणार आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या "जोडे मारा"आंदोलनला अद्यापही परवानगी मिळाली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलीस परवानगीची प्रतीक्षा आहे, मात्र परवानगी जरी मिळाली नाही तरी आज ठरवल्याप्रमाणे हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यादरम्यान हे आंदोलन केले जाणार आहे.

मालवण घटनेचा करणार निषेध

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून तिन्ही पक्षातील सर्व प्रमुख नेते यामध्ये सहभागी होणार आहेत. या आंदोलनासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राज्यभरातील मविआचे नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे भाजपही महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर देणार आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त!

दरम्यान, महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक आणि गेट वे ऑफ इंडिया या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल, दहशतवाद विरोधी पथक, सर्वाइलांस वॅन कंट्रोल करणारे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या मोर्च्यात एकूण जवळपास 5 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT